Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याप्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि सातारा पोलीस बेरोजगार तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि सातारा पोलीस बेरोजगार तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि सातारा पोलीस बेरोजगार तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला

कोल्हापूर/प्रतिनिधी : जगातील सर्वात मोठ्या अशासकीय संस्थांपैकी एक असलेल्या प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने सातारा जिल्हा पोलिसांच्या (एस. पी . विभाग) ‘उंच भरारी’ योजनेतुन मुलांना सक्षम बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट जिल्ह्यातील अशिक्षित व बेरोजगारी कमी करणे हा आहे. योजनेचा पहिला टप्पा दोन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो त्या म्हणजे कौशल्य विकास आणि रोजगार संधी. हा उपक्रम सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. प्रथम संस्थेच्या उपक्रमातील एक उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते
सुरुवातीच्या टप्प्यात ३०० हून अधिक तरुणांनी प्रथम च्या विविध कोर्स मध्ये प्रवेश घेतला.कोल्हापुर मध्ये विद्यार्थ्यांनी असिस्टंट इलेक्ट्रिकल मध्ये १९, टुव्हिलर फोरव्हिलर मॅकेनिकसाठी ७२ अहमद नगर मध्ये टुव्हिलर फोरव्हिलर मॅकेनिकसाठी १०७ तर भोर मध्ये सोलर / असिस्टंट इलेक्ट्रिकल साठी १२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रथम संस्थेद्वारे ८०% विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात आलेला आहे व राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी संस्थे चे काम सुरु आहे.कोल्हापूर मध्ये सदर कार्यक्रम हा कोटक च्या सहकार्याने सुरु आहे..
फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, रॉयल एनफिल्ड, टाटा मोटर्स सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तसेच स्थानिक व्यावसायिक,कंपन्यांमध्ये व उद्योजकांकडे रोजगार देण्यात आलेले आहे. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि सातारा पोलीस उंच भरारी योजना यांच्यातील हे सहकार्य जिल्ह्यातील तरुणांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे, त्यांना मौल्यवान कौशल्ये आणि उज्वल भविष्यासाठी सक्षम बनविण्यासाठी सातारा जिल्हा एस पी मा. समीर शेख साहेब व कोल्हापूर विभागा करीता प्रथम चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री सुधाकर भदरगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर हेड अस्मा पठाण, वैशाली कोळी व मनीषा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली योगेश गरुड (भोर) व नगर औरंगाबाद मधून दामोदर बालकुंदवार व दिवाकर भोयर यांचे काम सुरु आहे. या कार्यक्रमाचे मूळ उद्देश ग्रामीण भागातील गरजू , बेरोजगार युवक युवती ( शालेय/कॉलेज शिक्षणातून गळती झालेले व प्रवाहात असलेले ) व अशा बेरोजगार युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षणतुन रोजगार उपलब्ध करून देणे जेणे करून चुकीच्या/वाम मार्गाला तरुण पिढी जाणार नाही आणि देशाच्या राष्ट्रीय विकासाला बाधा येणार नाही.
नुकताच इलेक्ट्रिकल व टु व्हिलर मेकॅनिक कोर्से च्या प्रशिक्षणार्थ्याना शाहूपुरी डिव्हिजन चे पोलीस निरीक्षक मा.अजयकुमार सिंधकर साहेब व कोल्हापूर प्राथमिक शिक्षण पत संस्था चे माजी चेअरमन , विधमान संचालक,अनेक आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित असेलेले सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्री संजय कडेगाव सर यांच्या हस्ते प्रमाण करून प्रशिक्षणार्थ्यांचे सन्मान करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments