Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याग्राहक आणि सभासदांच्या विश्वासावरच युथ बँकेची यशस्वी घौडदौड सुरु – डॉ. चेतन...

ग्राहक आणि सभासदांच्या विश्वासावरच युथ बँकेची यशस्वी घौडदौड सुरु – डॉ. चेतन नरके

ग्राहक आणि सभासदांच्या विश्वासावरच युथ बँकेची यशस्वी घौडदौड सुरु – डॉ. चेतन नरके

कोल्हापूर/प्रतिनिधी : युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँकेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कळंबा येथील अमृतधारा फार्म येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडताना बँकेच्या यशस्वी वाटचालीत ग्राहक आणि सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानत त्यांच्या बळावरच बँक १०० कोटींच्या ठेवीचा टप्पा लवकरच पार करेल असा विश्वास अध्यक्ष डॉ.चेतन नरके यांनी व्यक्त केला.
बँकेच्या वतीने सर्व अत्याधुनिक सुविधा आता सुरु करण्यात आल्या आहेत. बँकेच्या एकूण ठेवीमध्ये २६% कासा ठेवीचे प्रमाण आहे बँकिंग क्षेत्रातील हे उत्तम प्रमाण मानले जाते. बँकेचा सी.आर.ए.आर. किमान ९% आवश्यक असताना तो १४.८०% इतका भक्कम झाला आहे. तसेच सलग तीन वर्षे निव्वळ एन.पी.ए. ० ते १% असून बँकेला चालू आर्थिक वर्षात ५२ लाखांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती या वेळी अध्यक्ष चेतन नरके यांनी दिली.
या निमित्ताने गृहिणी, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांसाठी कर्ज आणि ठेवीच्या आकर्षक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. उपाध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी सर्व सभासदांचे आभार मानले. अहवाल आणि नोटीस वाचन कार्यकारी संचालक रघुनाथ सूर्यवंशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments