Wednesday, June 25, 2025
spot_img
Homeग्लोबलगोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृतमहोत्सवी सर्वपक्षीय सोहळा...

गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृतमहोत्सवी सर्वपक्षीय सोहळा विविध उपक्रमाने साजरा करणार आमदार सतेज पाटील

गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृतमहोत्सवी सर्वपक्षीय सोहळा विविध उपक्रमाने साजरा करणार आमदार सतेज पाटील

सर्वपक्षीय पदाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्याबाबत आज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याची बैठक गोकुळ च्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये पार पडली.यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले कि, विश्वास पाटील (आबाजी) यांनी त्यांच्या आयुष्यातील ५० वर्षात शिरोली दुमालाचे डे. सरपंच ते गोकुळ दूध संघाचे चेअरमन असा या प्रवासात सहकार, समाजकारण व राजकारण यामध्ये अमुल्य योगदान दिले आहे. सर्व सामान्य लोकांशी नाळ जोडलेल्या तसेच गेली ४ दशके गोकुळ दूध संघ, कुंभी कासारी साखर कारखाना कुडित्रे, रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ, कोल्हापूर या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील ग्रामीण भागात विकासाची गंगा गावोगावी पोचविण्याचे काम केले असून अशा अजातशत्रू व्यक्तिमत्वाचा ७५ वा वाढदिवस एप्रिल महिन्यात होत असून हा भव्य असा सर्वपक्षीय अमृतमहोत्सवी गौरव सोहळा घेऊ असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ दूध संघाच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिले असून जिल्यात तसेच करवीर तालुक्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे विणण्याचे भरीव काम विश्वास पाटील (आबाजी) यांनी केले आहे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमिताने विविध सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करून असे मनोगत व्यक्त केले.
या बैठकीमध्ये विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समिती मान.अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील तंज्ञ मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन कार्यक्रम, दुध उत्पादकांना प्रोत्साहनसाठी जास्तीत जास्त दूध देणारी गाय व म्हैस या संबंधीची ‘आबाजीश्री’ स्पर्धा, युवकांसाठी योग शिबिरे, कुस्ती स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे ठरले तसेच मान. विश्वास पाटील यांच्या जीवनावर आधारित गौरव अंक गौरव समिती मार्फत स्वनिधीतून प्रकाशित करून दि.१३ एप्रिल २०२५ इ.रोजी माननीय विश्वास पाटील (आबाजी) यांच्या जन्म गावी शिरोली दु. ता.करवीर येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, जिल्ह्यातील खासदार, आमदार, मान्यवर यांच्या हस्ते भव्य असा सर्वपक्षीय अमृतमहोत्सवी गौरव सोहळा घेण्याचे सर्वानुमते ठरले.
याबैठकी वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील साहेब (सडोलीकर), केरबा भाऊ पाटील (कोथळी) बाबासाहेब देवकर (गाडेगोंडवाडी), श्रीमती उदयानीदेवी साळोखे (वाशी), सुनिल पाटील (वडणगे) एस.डी.जरग (महे), अमर पाटील (शिंगणापूर), युवराज गवळी (पाचगाव) यांनी मनोगते व सूचना व्यक्त केली.या बैठकीचे स्वागत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, तर आभार शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.यावेळी उपस्थित आमदार सतेज पाटील गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, कर्णसिंह गायकवाड, किसन चौगले, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, उदयसिंह पाटील (कौलवकर), यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, शेकापचे क्रांती पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे, एम.आर.पाटील कुरुकलीकर, सदाशिव चरापले, कृष्णात पाटील राशिवडेकर, कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाजीराव शेलार, विलास पाटील, शिवसेना (उभाठा) गटाचे बाजीराव पाटील शियेकर, शशिकांत खोत (कणेरीवाडी), प्रदीप झांबरे (गडमुडशिंगी), सागर पाटील (निगवे खा.), सुयोग वाडकर (खेबवडे), शंकर पाटील (गोकुळ शिरगाव), मोहन सालपे (क.बावडा), अर्जुन इंगळे (कणेरी), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर जांभळे (बालिंगा), शेतकरी संघटनेचे दादूमामा कामीरे, बुद्धिराज पाटील (महे), भगवान लोंढे (सांगरूळ), शेतकरी संघ संचालक जी.डी.पाटील (पाडळी), कृष्णात चाबूक, दिलीप खाडे (सांगरूळ), माजी जि.प.सदस्य पांडुरंग काशीद (यवलूज), एकनाथ पाटील (इस्पुर्ली), करवीर माजी प.स.सदस्य दत्तात्रय मुळीक, गोकुळ दूध संघाचे संचालक, भोगावती साखर कारखाना संचालक, कुंभी कासारी कारखाना संचालक, कोल्हापूर कृषी उत्पादन बाजार समितीचे सदस्य, रयत सेवा कृषी उद्योग संघाचे सदस्य, आजी माजी जि.प. व प.स.पदाधिकारी तसेच विश्वास पाटील यांच्या वर प्रेम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments