जिल्हा न्यायालयामध्ये ताण व्यवस्थापन व महिलांचे आरोग्य यासंदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): दि.२५.०२.२०२५ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व जिल्हा बार असोसिएशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात ताण व्यवस्थापन व महिलांचे आरोग्य यासंदर्भात वैद्यकिय शिबीर घेणेत आले.
शिबीरामध्ये डॉ. गोजिरा जगताप- कारेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने न्यायाधीश, वकील वर्ग तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या सत्रामध्ये डॉ. गोजिरा जगताप- कारेकर यांनी उपस्थितांची वैयक्तिक तपासणी व मार्गदर्शन केले. तसचे दुस-या सत्राामध्ये सामुहीक मार्गदर्शन व अत्यंत उपयुक्त अशा हेल्थ टिप्स दिल्या. कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश क्र.२ श्री. डी.व्ही. कश्यप, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. वाय. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. एस. एस. इंगळे, सर्व जिल्हा न्यायाधीश, सर्व वरीष्ठ स्तर न्यायाधीश, सर्व कनिष्ठ स्तर न्यायाधीश, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सर्जेराव खोत व किमीनल बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. डी. आर. कवाळे, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. श्रीकांत संकपाळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव श्री. एस. एस. इंगळे व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सचिन हुपरीकर यांनी केले.