मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक निधन झाले आहे. गेले काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना पुण्याला उपचारासाठी नेत असताना त्यांचा कराड नजीक मृत्यू झाला आहे.मराठा आरक्षण असो अथवा मराठा समाजाच्या न्यायासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. शिवाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी जोर लावला होता. न्यायालयाची लढण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठा क्रांती मोर्चा चे मोठे नुकसान झाले असून मराठा समाजात त्यांच्या अशा जाण्याने मोठे नुकसान झाले असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे.