Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरच्या शिवाय महेशवर शितोळे यास आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड   कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कारवाई…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. शिवशंकर मारजक्के यांच्या नेतृत्वाखाली सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रेन बायपास कार्यशाळा संपन्न

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

ब्राह्मण सभा करवीर यांच्यातर्फे श्री राम कथा आणि श्री राम यज्ञाचे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कंत्राटदारांच्या  मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कंत्राटदार यांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन १४ जून रोजी कोल्हापूरमध्ये

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा   कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना भूमीहीन करुण त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची 'गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ' म्हणून निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज 'स्वर आशा' गीत मैफिलीचे आयोजन आशा भोसले यांना आदरांजली कोल्हापूरकरांना संगीताचा अनुभव घेण्याचे आवाहन कोल्हापूर/प्रतिनिधी :.भारतीय…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

ताज्या महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर/प्रतिनिधी : देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणाऱ्या शहरांच्या…

माय मराठी

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने,  कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. सध्याच्या महागाईच्या दिवसात पुरूषांच्याबरोबरीने…

माय मराठी

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जंगी जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जंगी जल्लोषी स्वागत वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपशी जोडणार,…

माय मराठी

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  “इनो…

माय मराठी

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक…

माय मराठी

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवा

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवाई कोल्हापूर/प्रतिनिधी : गोपनीय माहितीच्या आधारे करवीर वनपरिक्षेत्राने मंगळवारी फुलेवाडी येथील…

माय मराठी

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी : पाचगाव येथे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल…

माय मराठी

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेची सभा पाणी प्रश्नावरून चांगलीच गाजली.सुरुवातीला स्वर्गीय उपमुख्य मंत्री अजित…

माय मराठी

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे मनीष मिडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात…

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणाऱ्या शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश होतो. नागरी सुविधा आणि विकासाच्या आधारावर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ‘टियर-२’ शहर म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील शिक्षणाचे आणि उत्तम आरोग्य सुविधांचे मोठे केंद्र आहे. कला, संस्कृती, क्रिडा क्षेत्रातही कोल्हापूरचा नावलौकिक आहे. मंजूर झालेले आय.टी.पार्क व छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत मंजूर स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबमुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळणार आहेत. आयटी, सेवा आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून परिसरात रोजगारासह मोठी आर्थिक उलाढाल होईल. येत्या काळात कोल्हापूरात औद्योगिक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राची नवी क्रांती दिसून येईल. यासह इतर महत्वकांक्षी प्रकल्पाच्या निर्मितीतून कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.कोल्हापूरात मंजूर झालेल्या आय.टी.पार्क व छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत मंजूर स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हब बाबत माहिती देण्याकरिता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, कोल्हापुरात आय.टी. पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित होता. याबाबत मी गत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधिमंडळाचे लक्ष वेधले होते. सदर प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक यांनी बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सभागृहास आश्वासित केले होते.कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने दि.०५ मार्च २०२६ रोजी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव आणला. महसूल विभागाच्या प्रस्तावानुसार शेंडापार्क परिसरातील गट क्रमांक ५८३, ५८७ आणि ५८८ मधील एकूण ३४.३६ हेक्टर जागा आयटी पार्क विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क उभारण्याची योजना असून त्यातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळेल. कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे जाहीर आभार..!!
संस्थानातील जनतेने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि व्यापार-उद्योगात प्रगती करावी, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, या उद्देशाने त्यांनी या मिल्सला स्वत:ची जागा व आर्थिक पाठबळ देवून चालना दिली. अशा या पवित्र जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला व विचारांना साजेसे स्मारक आणि महाराजांच्या नावे टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) निर्माण करण्यास वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांनी तत्वत: मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.राजर्षी शाहू महाराजांच्या या कार्यामुळेच कोल्हापूर हे आजही ‘रयतेची आणि शाहू महाराजांच्या विचारांची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. महाराजांनी ज्या उद्देशाने या मिल्सची स्थापना केली तो उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची, विचारांची प्रेरणा देणारे आणि व्यापार, उद्योगाद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे स्मारक कोल्हापूरवासियांना अपेक्षित आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि करवीरसंस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या जाज्वल इतिहासाची साक्ष देणारे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास, जुनी यंत्रसामग्री आणि कापड विणण्याच्या पद्धती दर्शविणारे शाहू मिल म्युझियम, टेक्सटाइल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इस्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाइन, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक १००० ते १२०० आसन क्षमता असणारे ऑडिटोरीयम, संगीत विद्यालय, मिल्स शेजारी असणाऱ्या कोटीतीर्थ तलावाकडील बाजूचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने अँम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्याच्या सूचना मंत्रालयीन बैठकीत दिल्या आहेत. जेणेकरून या स्मारकाद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण, उद्योग, कला क्षेत्राच्या उन्नतीसाठी असलेला उद्देश जपला जाईल.या पत्रकार परिषदेस शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्रीताई जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक प्रसाद चव्हाण, नगरसेविका मंगलराय साळोखे, नगरसेविका कौसर बागवान, नगरसेविका अर्चना पागर, नेपोलीयन सोनुले, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख रणजित जाधव, सुनील जाधव, इंद्रजित आडगुळे, अनिल पाटील, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, दुर्गेश लिंग्रस, उदय भोसले, राज जाधव, विनय वाणी, प्रभू गायकवाड, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने,  कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. सध्याच्या महागाईच्या दिवसात पुरूषांच्याबरोबरीने महिलांनी उद्योग- व्यवसाय सुरू करत कुटूंबाला हातभार लावावा, यासाठी भागीरथी महिला संस्था प्रयत्नशिल आहे. महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून, आर्थिकदृष्टया सक्षम बनावे, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले.
भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील महिलांसाठी, मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. भागीरथीच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, नगरसेविका पुर्वा राणे, अर्चना कोराणे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरवात झाली. भागीरथी संस्थेने आजवर २५ ते ३० हजार महिलांना उद्योगशील बनवले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह, भागीरथी पतसंस्थेच्यावतीने उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भागीरथी संस्था प्रयत्न करते. आजवर शेकडो महिला स्वयंपूर्ण बनल्या आहेत. यापुढेही महिला सक्षमीकरणाची चळवळ कायम सुरू असेल, असे अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. त्यानंतर अश्‍विनी वास्कर यांनी महिलांना नीळ, फिनेल, वॉशिंग पावडर, सेंट, साबण, अगरबत्ती, केक, चौपाटी पदार्थ अशा विविध पदार्थांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. तर नगरसेविका पुर्वा राणे यांनीही उपस्थित महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी नम्रता देसाई, प्रज्ञा इंगवले यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जंगी जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जंगी जल्लोषी स्वागत

वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपशी जोडणार, युवा मोर्चाचे संघटन मजबूत करणार, कृष्णराज महाडिक यांंची माहिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून लोकांच्या मनामध्ये आपले एक नवे स्थान निर्माण केले आहे.याचीच दखल घेत भाजपने कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली आहे.या निवडीनंतर आज भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी युवा नेतृत्वानी त्यांचे जंगी स्वागत केले.कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी छत्रपती ताराराणी चौक येथे प्रचंड गर्दी झाली होती. महाराणी ताराराणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत भव्य रॅली काढून कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषी जंगी स्वागत करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे फोटो असलेले फलक आणि भाजपाचा ध्वज हातात घेतलेल्या तरूणाईमध्ये सळसळता उत्साह यावेळी होता. पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपाशी जोडण्यात येईल आणि भाजप युवा मोर्चाचे संघटन राज्यात मजबुत करणार असल्याचे युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नमूद केले.
रॅलीनंतर भाजप जिल्हा कार्यालयात कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जिल्हयातील कार्यकर्त्यांनी आणि युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती.युथ आयकॉन आणि कोल्हापूरचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांच्या भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे राज्यस्तरावरील प्रदेशाध्यक्षासारखं महत्वाचे पद कोल्हापुरला मिळाले आहे.याचा भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे आज दुपारपासून भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईचे जथ्थे ताराराणी चौकाच्या दिशेने येत होते. छत्रपती ताराराणी चौक कार्यकर्त्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. सायंकाळी पाच वाजता कृष्णराज महाडिक यांचे छत्रपती ताराराणी चौकात आगमन झाले. महापौर रूपाराणी निकम यांनी कृष्णराज महाडिक यांचे स्वागत केले. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळयाला अभिवादन करून, रॅलीला सुरूवात झाली. सजवलेल्या वाहनावर कृष्णराज महाडिक यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव, मुरलीधर जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते. भाजपचे ध्वज आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो असलेले फलक हातात घेवून भाजप आणि कृष्णराज महाडिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.
ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बी न्यूज कॉर्नर मार्गे रॅली व्हिनस कॉर्नर चौकात आली. याठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयाला फुलं अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आईसाहेब महाराज पुतळा मार्गे ही रॅली बिंदू चौकात आली. बिंदू चौकातील शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला.              रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी कृष्णराज महाडिक यांचे औक्षण केले. तसेच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. या रॅलीत चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भिमा कारखान्याचे चेअरमन विश्‍वराज महाडिक, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, देवराज बारदेस्कर, महेश पाटील, चंद्रकांत घाटगे, संग्राम निकम, महेश वासुदेव, राजसिंह शेळके यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी तसंच युवा मोर्चाचे राज्यभरातील आणि जिल्हयातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
एकच चर्चा… युवा मोर्चा…, कृष्णराज महाडिक यांचा विजय असो, यासह विविध घोषणा देत या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषी समारोप झाला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून गेला होता. माजी नगरसेवक किरण शिराळे, नगरसेवक विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. त्यामध्ये प्रीतम शिराळे, मंगेश नरोटे, अमित मंडपे, गौतम झाड, संदीप खाडे, सचिन रोटे, सागर धुमाई, वृषाली शिराळे, अस्मिता शिराळे, प्रणाली बावडेकर, शीतल शिराळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या पुष्पवृष्टीत सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाडिक आणि भाजपचा जयघोष केला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे स्वागत आज ठिकठिकाणी जल्लोषात झाले. स्टेशन रोडवरून ही रॅली पुढे आली. तिथे नगरसेविका निलिमा पाटील, शैलेश पाटील, तसेच भाजपा शाहुपूरी कोअर कमिटी सदस्य आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून गोकुळ हॉटेल कॉर्नरला रॅलीचे जल्लोषी स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्यांना आणि नागरिकांना सहा हजार पाण्याच्या बाटल्या, कोकम सरबत, आंबा बर्फीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे नागाळा पार्कातील भाजप कार्यालयात आगमन झाले. येथे त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावतीने जल्लोषी स्वागत झाले. एकच चर्चा.. युवा मोर्चा… या घोषणांनी भाजप कार्यालय आणि परिसर दुमदुमून गेला. दरम्यान कृष्णराज महाडिक यांचे स्वागत करताना त्यांना विठ्ठलाची प्रतिमा दिली. तसेच वारकरी वेश परिधान करायला लावला. गळयात तुळशी हार घातला. काहींनी शाल, काहींनी बुके, तर काहींनी गुलाबपुष्प देवून कृष्णराज महाडिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यालयात भाजप प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते तानाजी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चौगले, नररसेवक विजय जाधव, राजसिंह निंबाळकर, नाथाजी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्‍वजित पोवार, रवीश पाटील, प्रशांत बुगले, ऍड. संपतराव पवार, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, अनुप देसाई, समयश्री कुमार अय्यर, डॉ. सदानंद राजवर्धन, शंतनू मोहिते, ओमवीर महाडिक, जयेश घरपणकर, अवधुत अपराध, सुधीर राणे यासोबतच मोहळ, सांगोला, पळूज, सिकंदर टाकळी इथले सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकार्‍यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
तत्पूर्वी भाजप युवा मोर्चाच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या आठवड्यात सर्वानुमते निवड केली. त्यानंतर आज कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
दरम्यान दुपारी ३ वाजता रुईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्यावतीने कृष्णराज यांचे हृदयस्पर्शी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करत औक्षणासह, मिठाई भरवून कृष्णराज यांचे महाडिक परिवाराकडून स्वागत करण्यात आले. या छोटेखानी स्वागत कार्यक्रमामुळे महाडिक परिवारामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी राज्यातील भाजप पक्ष संघटनात्मक कार्यकारिणी गेल्या आठवड्यात जाहीर केली. त्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची निवड केली. मान दिलेल्या शब्दांचा, अभिमान युवा नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा आणि जल्लोष कार्यकर्त्यांचा असंच पक्षाच्या या निवडीचे वर्णन करता येईल. कृष्णराज महाडिक यांच्या निवडीने राज्यातील युवा वर्गात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीनंतर गेले आठवडाभर कृष्णराज महाडिक पक्षाच्या कामानिमित्त मुंबईतच थांबून होते. आई सौ. अरुंधती महाडिक, आजी श्रीमती शकुंतला महाडिक, मंगल महाडिक यांच्यासह परिवाराने कृष्णराज यांचे औक्षण केले. गुलाब पुष्पांचा वर्षाव करत, मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी कृष्णराज यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. कृष्णराज यांना घट्ट आलिंगन देत कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अतिशय भावनिक वातावरणात झालेल्या या स्वागत सोहळ्याने कृष्णराज महाडिक भारावून गेले होेते. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन पक्षाने आपल्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी आपण कृतीतून सिध्द करुन दाखवू, असा निर्धार कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवला. राज्यात १८ ते २८ वयोगटातील युवा वर्गाची संख्या मोठी आहे. या युवाशक्तीला राजकारण, समाजकारणात आपण सक्रीय सहभागी करुन घेणार आहे. सुमारे १ लाख युवा कार्यकर्त्यांना भाजप युवा मोर्चाशी जोडण्याचा आपला संकल्प असून, त्यातून एक सक्षम युवा महाराष्ट्राची बांधणी करणार असल्याचा मनोदय कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.
येत्या ५ वर्षात युवा वर्गासाठी आपले सामाजिक व्हीजन मोठे आहे. त्यासाठी आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असेही कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांची राज्य सभेवर निवड झाल्यानंतर महाडिक कुटुंबियात जे आनंदी वातावरण होते, त्याचे आनंदी वातावरणाची प्रचिती आज कृष्णराज महाडिक यांच्या निवडीच्या निमित्ताने आली. कृष्णराज यांच्या निवडीच्या निमित्ताने या आठवणींना श्रीमती शकुंतला महाडिक यांनी उजाळा दिला. गेल्या ४ महिन्यात राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युवा पिढी मोठ्या प्रमाणावर उतरली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग निवडूनही आला आहे. त्यामुळे या युवा वर्गाचे राज्यस्तरीय नेतृत्व करण्याची जबाबदारी खर्‍या अर्थाने युवा वर्गाचे आयड़ॉल असणार्‍या कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजपने सोपवली आहे, हेच त्यांच्या निवडीवरुन सिध्द होत आहे.

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्‍या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली.                                                   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली.            दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  “इनो क्वेस्ट २के२६” नाविन्यपूर्ण कल्पना, प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. संस्थेच्या ‘संस्थात्मक नवोपक्रम परिषदे’च्या (आयआयसी) पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले अभिनव प्रकल्प आणि कल्पना सादर करणार आहेत. उद्योगाभिमुख विचारसरणी, नवउद्योजकता संस्कृती आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सांगितले.
स्पर्धांमध्ये ‘इनोव्हाट्रिक्स’, ‘आयडीया पिचिंग स्पर्धा’, ‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’, ‘पोस्टर एक्स प्रो’ आणि ‘टेक रोबस्टा’ या प्रमुख विभागांचा समावेश आहे. ‘इनोव्हाट्रिक्स’ अंतर्गत ‘सर्किट्रिक्स’ आणि ‘इनोव्हेटर्स अरेना’ होणार असून, एक किंवा दोन सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे.
‘आयडीया पिचिंग’ स्पर्धेत समस्या मांडणी, प्रस्तावित उपाययोजना, लक्ष्यित बाजारपेठ, उत्पन्न मॉडेल तसेच नाविन्य आणि विस्तारक्षमता यांचा समावेश असलेले सादरीकरण अपेक्षित आहे. या स्पर्धेत कमाल चार सदस्यांच्या गटांना सहभाग देता येणार आहे.‘‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’ अंतर्गत ग्रँड प्रिक्स ऑफ कोड, ब्लाइंड कोडिंग अरेना, पिक्सेल फिक्स, स्क्विड हंट, ई-स्पोर्ट्स (बीएमआय), ई-स्पोर्ट्स   (फ्री फायर) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पोस्टर एक्स प्रो’ मध्ये सस्टनेबल अँड ग्रीन कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री ४.० अँड ऑटोमेशन, ५जी  कमुनिकेशन  सिस्टीम, वायरलेस कम्युनिकेशन: फ्युचर नेटवर्क आर्किटेक्चर, आर्टिफिशियल इंटीजिलेन्स आणि स्मार्ट सिटी या विषयांवर सादरीकरण होणार आहे. ‘टेक रोबस्टा’ अंतर्गत वळणदार मार्ग, गतीरोधक, बोगदे आणि उतार असलेल्या मार्गावर यंत्रमानव शर्यत आयोजित करण्यात आली असून, दोन सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे.प्रत्येक स्पर्धेसाठी प्रति सहभागी नाममात्र प्रवेश शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. विजेत्यांना प्रायोजकाकडून आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संबंधित विद्यार्थी समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय-२०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी यांनी नुकतीच पुरस्कारांची घोषणा केली.
डॉ. जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा ललित लेखसंग्रह कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये मानवतावादाच्या सूत्रामध्ये गुंफलेल्या निवडक ३० लेखांचा समावेश आहे. व्यापक जागतिक समुदायामध्ये मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा आग्रह या लेखनामागे आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.
डॉ. जत्राटकर यांची ‘निखळ: जागर संवेदनांचा’, ‘समाज आणि माध्यमं’ ही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि ध्यास फाऊंडेशन, पलूस आदी संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कारही लाभले आहेत.

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवा

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवा

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोपनीय माहितीच्या आधारे करवीर वनपरिक्षेत्राने मंगळवारी फुलेवाडी येथील रिंगरोड परिसरातील फ्रेंडशिप फिश कंपनीवर छापा टाकून अनूसुचित वन्यजीव प्रकारातील मृत ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ (Mobula kuhlii) हा मासा जप्त केला. संबंधित मासा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती.वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार करवीर वनपरिक्षेत्रात दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मासा ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी सुनील विनोद सातपुते (रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक, कोल्हापूर चैत्रिशाल पाटील तसेच सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर नंदकुमार नलवडे, वनपाल सागर कोळी, वनरक्षक ओंकार भोसले, विकास घोलप, महादेव कुंभार, विदेश तांबारे, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर आणि मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांनी कारवाईत सहभाग घेतला.अनूसुचित वन्यजीवांची खरेदी-विक्री अथवा साठा आढळल्यास तात्काळ वन्यजीव कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : पाचगाव येथे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न झाले.विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यु’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या मातीत मिसळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली ही सामाजिक बांधिलकी भविष्यात सुसंस्कृत समाज घडवेल व त्यातूनच समृध्द गावाचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन पाचगावच्या सरपंच सौ. प्रियांका संग्राम पाटील यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट आणि मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पाचगाव येथे हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
सरपंच पाटील म्हणाल्या, केवळ वर्गातील चार भिंतीमध्ये शिक्षण पूर्ण होत नाही. समाजातील अडीअडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे हेच खरे शिक्षण आहे. या शिबिरातील स्वच्छता अभियान आणि ग्रामसंवादातून विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे महत्त्व ओळखले आहे. ‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी पाचगावचे ग्रामस्थ आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी खांद्याला खांदा लावून काम करतील.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले म्हणाले, विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी समाजसेवेला आपले आद्य कर्तव्य मानतात. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी हे तरुण राष्ट्रसेवक म्हणून सदैव तत्पर राहतील.
मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा म्हणाले, ग्रामविकासासोबतच आरोग्य साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती, स्वच्छतेबाबतच ग्रामस्थांचे प्रबोधन करून एक ‘आरोग्यसंपन्न गाव’ घडवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल टाकले आहे.
स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले.
या विशेष शिबिरामध्ये श्रमसंस्कार, ग्रामविकास व सामाजिक बांधिलकी यांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम, ग्रामसंवाद तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये राबवले.
यावेळी उपसरपंच दिपाली प्रकाश गाडगीळ, केंद्र शाळा मुख्याध्यापक अशोक पाटील, विद्यामंदिर शांतीनगरच्या मुख्याध्यापिका मंगल देवठाणेकर, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. अद्वैत राठोड, मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. जगन्नाथ शेटे, सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेची सभा पाणी प्रश्नावरून चांगलीच गाजली.सुरुवातीला स्वर्गीय उपमुख्य मंत्री अजित दादा पवार यांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आली.येत्या पंधरा दिवसात प्रशासनाने जागा मंजूर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .प्रशासनाची गती धीमी आहे .कोल्हापूर साठी लोकनेत्या न खूप काही केलं आहे त्यामुळे शिरोली जकात नाका जवळ किंवा बास्केट ब्रीज जवळील जागा याबाबत चर्चा करण्यात आली .त्याच्या कामाला दूरदृष्टीला कार्यकिरतीला साजेसा पुतळा व्हावा अशी मागणी करण्यात आली.सर्व पक्षांना एकत्र घेऊन जागा शोधूया आणि मागणीवर बोलतांना महापौर यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले.सभेत नगररचना विभागावर टीका राजेश लाटकर , शारंधर देशमुख ,आदिल फरास,रिंकू उर्फ विजय देसाई यांनी केली.
स्वच्छता आणि लाईट यांच्यामुळे शहरात असुरक्षितता आहे .करार केले पण त्यानंतर त्या सर्व गोष्टींवर दंड झाले आणि ते वसूल झाले का असा सवाल जयश्री चव्हाण यांनी केला .नवीन दिवे मेंटेनन्स ,२०२४ पासून १ कोटी रुपये दंड लावलेला आहे .संबंधित कंपनीला रमेश मस्कर शहर अभियंता कबुली. सोई सुविधा न बाबत सभागृहात मुरलीधर जाधवांचा आंधाराचा फायदा घ्यायला अधिकारी कोण सामील आहेत का असा सवाल करत शहर अभियंता मस्कर यांना धारेवर धरले. शासनाचा.महापालिका या सर्वावर काय निर्णय घेणार .दुर्वास कदम यांनी विचारणा केली.

(बैठक अहवाल वाचन – नगरसचिव सुनील बिदरे ) यांनी केले.
पाणीप्रश्न – नगरसेविका पूर्वा राणे , ऋतुराज क्षीरसागर , सुनिल शेंडे, सत्यजित जाधव, अभिजित खतकर ,विशाल शिरोळे यांनी आपली मते मांडली.यावर महापौर यांनी बोलताना पाण्याचा प्रश्न आज अखेचा असेल .प्रत्येक प्रभागासाठी एक माणूस .पाणी गळती .तीन हजार बोगस कनेक्शन . दंड लावण्याऐवजी ही कनेक्शन नियमितिकरण करा . मीटर रिडर ५०० रुपये जेवण बोगस पाणी कनेक्शन देतात. यावर महापौरांनी दोन महिन्यात पाणी प्रश्न सोडवा असे सांगून जल अभियंता हर्षजीत घाटगे – शासकीय कार्यालय १६ कोटी थकबाकी – ग्रामीण भाग – झोपडपट्टी ८ कोटी .
अमृत योजनेतील निधी उपलब्ध झाला तर पाणी ड्रेनेजसह काम पूर्ण होतील.महापौर – ड्रेनेज काम पूर्ण करा . मगच रस्ते करा अशा सूचना दिल्या.यावर आयुक्त के. मंजूलक्ष्मी १५० कोटी निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे .ज्यादा टँकरची उपलब्धता करणार .मागील बजेट ७०० कोटींच होतं आता ते वाढले असल्याचे स्पष्ट केले.उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढ करावी .मात्र आधी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी नगरसेवकांनी मागणी सभेत केली.प्रत्येक विभागाची दर आठवड्याला मीटिंग आणि सर्व माहिती ह्या मीटिंग मध्ये हवेत .येत्या महिन्याभरात प्रत्येक कंपनीवर दंड वसूल करावेत .
कोल्हापुरात प्रकाश म्हणजे प्रकाश पडला पाहिजे .प्रत्येकाने रात्री पाहणी केली पाहिजे ज्याला ही जमणार नाही त्या अधिकाऱ्याने राजीनामा द्यावा असा इशारा अमर समर्थ यांनी दिला.

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे मनीष मिडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘द ज्वेलस ऑफ इंडिया – भारत की शान, भारत का अभिमान’ पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा हॉटेल द अशोका येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय कर्तृत्व, उद्योजकता आणि राष्ट्रीय अभिमान यांचा गौरव करणारा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा होता .
या सोहळ्यात संजय घोडावत समूहाचे संस्थापक व अध्यक्ष संजयजी दानचंदजी घोडावत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. द ज्वेल्स ऑफ इंडिया हा पुरस्कार यावेळी संजयजींना प्राप्त झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींचा परिचय असणाऱ्या “मास्टर इन द आर्ट ऑफ स्टिम्युलस, रिस्पॉन्स अँड ग्रोथ” या पुस्तकात संजयजींच्या प्रेरणादायी प्रवासाचा समावेश करण्यात आला असून, भारतीय उद्योजकतेचे ज्वलंत उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
ग्रामीण पार्श्वभूमीतून जागतिक स्तरावर उद्योगसमूह उभारण्याचा संजयजींचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. संजय घोडावत ग्रुप महाराष्ट्रामध्ये औद्योगिक, शिक्षण, नागरी विमान, ऊर्जा, रिअल इस्टेट, दैनंदिन घरगुती वस्तू व रिटेल अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. ११००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना संजयजींनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तर वीस हजार पेक्षा अधिक विद्यार्थी संजय घोडावत शिक्षण समूहामध्ये शिक्षण घेत आहेत. सौ सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अंध मुलांसाठी शाळा, वृद्धाश्रम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण कार्यक्रम होत असतात. संजयजी नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असतात. शून्यातून विश्व निर्माण करून, गगनभरारी घेणाऱ्या पण जमिनीवर पाय असणाऱ्या संजयजींच्या कार्याचा व कर्तुत्वाचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
देशाच्या सांस्कृतिक आणि औद्योगिक प्रगतीत योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचे शेखावत यांनी यावेळी कौतुक केले.
या सोहळ्याचे आयोजन मनीष कुमावत (संचालक, मनीश मीडिया) यांनी केले होते. तसेच ईश्वरजी (ब्रँडसवर्क टेकनॉलॉजिस) यांच्यासह अनेक उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. दिवंगत श्री चंदमल कुमावत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
देश-विदेशातील उद्योगक्षेत्रातील दिग्गज उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. संजयजी घोडावत यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वच ठिकाणी त्यांचे कौतुक होत आहे व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.