Friday, October 25, 2024
Home ताज्या पांजरपोळ संस्थेला साडेचार टन पशुखाद्याची मदत कांतिलाल ओसवाल आणि सहकाऱ्यांनी भरवला घास

पांजरपोळ संस्थेला साडेचार टन पशुखाद्याची मदत कांतिलाल ओसवाल आणि सहकाऱ्यांनी भरवला घास

पांजरपोळ संस्थेला साडेचार टन पशुखाद्याची मदत कांतिलाल ओसवाल आणि सहकाऱ्यांनी भरवला घास
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील पांजरपोळ संस्थेला आज साडेचार टन पशुखाद्याची मदत करण्यात आली.कांतिलाल गुलाबचंद ओसवाल (केजी), विशाल बोंगाळे, हितेश गुलाबचंद राठोड, योगेश मांडरेकर, दौलत घाटगे यांच्या वतीने ही मदत राजाराम पोलिस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या हस्ते देण्यात आली. संस्थेच्या वतीने डॉ. राजकुमार बागल, संतोष देसाई आणि वैशाली पिसे यांनी याचा स्वीकार केला. यावेळी पोलिस निरीक्षक श्री. डुबल यांचा श्री. ओसवाल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, या संदर्भात श्री. ओसवाल यांनी सांगितले की, मानवता धर्मातून पांजरपोळ संस्थेला मदत करण्यात आली. गाय, बैल, म्हैस अशा विविध प्रकारच्या ३०० जनावरांना एक घास या भावनेतून केलेल्या मदतीमध्ये चार टन ७०० किलो पशुखाद्य आहे. त्यामध्ये मका, कोंडा, मका चुनी, सरकी पेंड, सूर्यफूल पेंड आणि शेंग पेंडेचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments