केआयटीच्या विद्यार्थ्यांची अदानी ग्रुपमध्ये अभिनंदनीय निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर येथील संगणक शारुा विभागाच्या दोन विद्यार्थ्यांची सुप्रसिध्द अदानी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये निवड झाली असून या विद्यार्थ्यांना वर्षातील सर्वांधिक पॅकेज मिळाल्याची माहिती केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील व संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी दिली. ते पुढे असे म्हणाले, केवळ आयआयटी मधील विद्यार्थ्यांसाठी कँपस घेणा-या अदानी ग्रुपने पश्चिम महाराष्ट्रात आणि केआयटीत सर्वप्रथम येऊन केआयटीच्या गुणवत्तेचे कौतुक केले. संगणकशारुा विभाग प्रमुख डॉ. ममता कलस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण चार टप्प्यांमध्ये या कँपसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झाली. पहिल्या टप्प्यामध्ये गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करुन आयटी व सीएससी यामधील प्रथम दहा अशा वीस विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर या विद्याथ्र्यांची बौध्दिक व तांत्रिक ज्ञानाची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर या विद्याथ्र्यांची यासाठी 90 मिनिटांची कोडींग चाचणी घेण्यात आली आणि शेवटी मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचा अंतिम निकाल कळविण्यात आला. यामध्ये वेदिका हर्डिकर व वागेश्वर यादव या विद्यार्थ्यांची निवड झाली. हा निकाल देताना अदानी ग्रुपच्या एचआर टीमने केआयटीच्या विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याचे विशेष कौतुक केले. या विद्याथ्र्यांच्या यशासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. ममता कलस व ट्रेनिक प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. अमित सरकार यांनी अथक परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले.
या विद्याथ्र्यांच्या निवडीमुळे केआयटीची गुणवत्ता अधोरेखित झाली असून या यशाबद्दल केआयटीचे अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी, सचिव श्री. दिपक चौगुले, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, सर्व संचालक विश्वस्त यांनी त्यांचे अभिनंदन केले.