महाराष्ट्रातील सर्व प्रार्थना स्थळे सुरू मुख्यमंत्री यांचे गणी आजरेकर यांनी मानले आभार
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना.श्री उद्धवजी ठाकरे व महाआघाडी यांनी घेतला त्याबाबत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले आहेत.मा. मुख्यमंत्री हे वडीलधाऱ्यासारखे वागत असून सर्व महाराष्ट्राच्या कुटुंबातील काळजी वाहणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत व महाराष्ट्रातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना त्यांनी मनापासून सहकार्य केले आहे.
दिवाळीदिवशी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळी भेट दिली आहे मस्जिद उघडले असेल तरी देखील शासनाने कोरोनाच्या काळात घालून दिलेल्या नियमाचे व अटींचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन मुस्लिम समाजाने पाळावे व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी.मस्जिदमध्ये अल्लाकडे प्रार्थना करावी की महाराष्ट्र , भारतात, सुख-समृद्धी वाढावी व दुश्मनापासून याच संरक्षण व्हावे याकरता दुवा करावी असे आवाहन गणी आजरेकर यांनी केले आहे.