कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान
२७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान
कोल्हापूर, दि.२० (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असून जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची या ४ तासाची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
२७१- चंदगड – २२.०१ टक्के
२७२- राधानगरी – २३.०० टक्के
२७३- कागल – २३.६८ टक्के
२७४- कोल्हापूर दक्षिण – १७.५७ टक्के
२७५- करवीर – २६.१३ टक्के
२७६- कोल्हापूर उत्तर – २०.७५ टक्के
२७७- शाहूवाडी – १७.५२ टक्के
२७८- हातकणगंले – १४.२५ टक्के
२७९- इचलकरंजी – १९.७७ टक्के
२८०- शिरोळ – २१.४३ टक्के