केआयटी मेकॅनिकलच्या ६ विद्यार्थ्यांची ‘अदानी ग्रुप’ मध्ये निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरात मधील अहमदाबाद येथील अदानी ग्रुपच्या डेटा सेंटर बिझनेस @ अदानी कॉनेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त)महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील सहा विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. कंपनीने प्रथम विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन त्यातील १६ विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या फेरीअंती करण्यात आली. त्यानंतर त्यातील ६ विद्यार्थी कंपनीने निवडले.अंतिम मुलाखतीतून खालील सहा विद्यार्थ्यांची निवड कंपनीने केलेली आहे. यामध्ये सुकुमार जोशी, अमन फाळके, शमिता कार्वेकर, किरण कांबळे, मंथन येरनाल, शिवतेज सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये आहे. सदर विद्यार्थ्यांना ४.१ लाखाचे पॅकेज कंपनीने घोषित केले असून सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ४.५ लाखाचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना संगणक विभाग प्रमुख डॉ.ममता कलस व अदानी ग्रुपचे श्री. संजय कोठा यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळाले आहे. मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर आणि विभागाचे प्लेसमेंट संयोजक श्री. प्रवीण गोसावी यांचे विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन मिळाले.
संस्थेचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी ,अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, सचिव श्री. दिपक चौगुले व अन्य विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.