Thursday, November 21, 2024
Home ताज्या अन्‍न सुरक्षा कायद्याचे पालन करणे सर्वांच्‍या हिताचे सहकार सप्‍ताह निमित्‍य गोकुळचे आवाहन

अन्‍न सुरक्षा कायद्याचे पालन करणे सर्वांच्‍या हिताचे सहकार सप्‍ताह निमित्‍य गोकुळचे आवाहन

अन्‍न सुरक्षा कायद्याचे पालन करणे सर्वांच्‍या हिताचे सहकार सप्‍ताह निमित्‍य गोकुळचे आवाहन

कोल्‍हापूर/प्रतिनिधी :  भारत सरकारच्‍या आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण विभागामार्फत अन्‍न सुरक्षा कायद्या अंतर्गत शिक्षा व दंडाची मर्यादा वाढवून अत्‍यंत कडक  अंमलबजावणी करण्‍यात येणार असून, सर्व दूध उत्‍पादक, दूध संस्‍था,दूध विक्रेते यांनी सतर्क राहून काम करणे आवश्‍यक असल्‍याचे गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) यांनी ६७ व्‍या सहकार सप्‍ताह निमित्‍य आयोजित ध्‍वजारोहण कार्यक्रमावेळी सर्व अधिका-यांना संबोधित केले.
अन्‍न सुरक्षा कायदा २००६, नियम २०११ यातील सेक्‍शन ५९ प्रमाणे पूर्वी पेक्षा दंडाची आणि सक्‍तमजुरीची शिक्षा दुप्‍पट ते पाचपटीने वाढविण्‍यात आ‍ली आहे.  याबाबतची सूचना सार्वजनीक माहितीसाठी भारत सरकारच्‍या आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण विभागाच्‍या संकेतस्‍थळावर दिनांक २३ सप्‍टेंबर २०२० ई.रोजी प्रसिध्‍द केलेली आहे.  यामध्‍ये श‍रीरास अपायकारक नसलेल्‍या परंतु भेसळ केलेल्‍या दूधासाठी १ लाखावरुन ३ लाखांपर्यंत  तसेच शरीरास अपयकारक नसलेले परंतु शासनाने निर्बंध घातलेले पदार्थ मिसळून भेसळ केल्‍यास तब्‍बल १ वर्ष सक्‍तमजूरी आणि ५ लाख इतका दंड निश्चित करण्‍यात आला आहे. शरीरास अपायकारक असलेलया  पदार्थांच्‍या भेसळीसाठी ६ वर्ष सक्‍तमजुरी आणि दंडाची आकारणी ५ लाखांहून ७ लाखांपर्यंत तरतूद करण्‍यात आली आहे. भेसळीमुळे मृत्‍यु झाल्‍यास जन्‍मठेप आणि १० लाखांपर्यंतचा दंड अशी तरतूद सेक्‍शन ५९ प्रमाणे करण्‍यात आली आहे.
याच कायद्यातील सेक्‍शन ६२ प्रमाणे अन्‍न सुरक्षा अधिका-यांना त्‍यांच्‍या कारवाईच्‍या कामात अडथळा आणल्‍यास  पूर्वीच्‍या ३  महिन्‍यांच्‍या सक्‍तमजुरीच्‍या शिक्षेत वाढ करुन ती २ वर्ष आणि पूर्वीच्‍या १ लाख रुपये दंडामध्‍ये वाढ करुन ५ लाख रुपये इतक्‍या दंडाची तरतूद केली आहे.
याच कायद्यातील सेक्‍शन ६३ प्रमाणे अन्‍न पदार्थांचा साठा व वितरण करण्‍याकरीता योग्‍य तो परवाना नसल्‍यास ६ महिने सक्‍तमजुरी आणि पूर्वीच्‍या ५ लाख रुपये इतक्‍या दंडा ऐवजी ५ पटीने दंड वाढवून तो तब्‍बल २५ लाख रुपये इतका करण्‍यात आला आहे.
सेक्शन ८४ मध्‍ये बदल करुन पशुखाद्य उत्‍पादन करणे आणि विक्री करणे यासाठीचे नियम व अटी लवकरच या प्राधीकरणामार्फत तयार करण्‍यात येणार आहेत.
सहकार सप्‍ताहानिमित्त ध्‍वजारोहण गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील आबाजी यांच्‍या हस्‍ते ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या प्रांगणात करण्‍यात आले. यावेळी माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाळासो खाडे, उदय पाटील, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील,व्‍यवस्‍थापक डेअरी ए.वाय.चौधरी, व्‍यवस्‍थापक गुणनियंञण सुरज समुद्रे, गोकुळ नागरी सहकारी पतसंस्‍थेचे चेअरमन शशिकांत पाटील, गोकुळचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments