विक्री कोविडपूर्व पातळीवर परत, परवडण्याची क्षमता सर्वाधिक आणि त्यामुळे वाढत्या किंमती तसेच सर्वोच्च पातळीच्या विकासकांच्या वाट्यात वाढ
पुणे, 7 जानेवारी २०२१ – गेरा डेव्हलपमेंट्स या रिअल इस्टेट व्यवसायातील प्रणेते आणि पुणे, गोवा व बंगळुरू येथील प्रतिष्ठित निवासी आणि कमर्शियल प्रकल्पाच्या पुरस्कारविजेत्या निर्मात्यांनी आज आपल्या द्वैवार्षिक अहवाल गेरा पुणे रेसिडेंशियल रिअल्टी रिपोर्टच्या जानेवारी २०२१ च्या आवृत्तीचे अनावरण केले.
भारतातील पुणे रेसिडेंशियल रिअल्टी बाजारपेठेचा सर्वाधिक काळ चाललेला आणि जनगणनेवर आधारित असलेला हा अहवाल गेरा डेव्हलपमंट्सने केलेल्या प्राथमिक व मालकीच्या संशोधनावर आधारित आहे आणि त्यात शहराच्या मध्यभागापासून ३० किमीच्या अंतरात असलेल्या सर्व विद्यमान प्रकल्प व्याप्त करण्यात आले आहेत.
२०२० मधील निवासी रिअल्टी क्षेत्राच्या कामगिरीवर कोविड-१९ ची जागतिक साथ आणि त्याचा परिणाम म्हणून झालेले लॉकडाऊन यांचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे उद्योगातील कार्ये ठप्प झाली. तसेच विकासकांना मजुरांच्या कमतरतेचाही सामना करावा लागला आणि स्थलांतरितांच्या समस्येमुळे अतिरिक्त खर्च करावा लागला. मात्र, लॉकडाऊननंतरही पुणे निवासी रिअल इस्टेट बाजारपेठांनी चिंतेतून दूर आल्याचे आणि विविध ठिकाणी अत्यंत प्रोत्साहक आकडेवारी पार केल्याचे दिसून आले आहे.
हा प्रभाव सर्व निकषांवर दिसून येतो. विक्री सामान्यरित्या सुरू झाली आहे आणि कोविडपूर्व पातळ्यांवर आली आहे. शहरातील सरासरी किंमती ३.५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. संपूर्ण आणि टक्केवारीच्या बाबतीत इन्व्हेंटरी मागील सहा वर्षांत सर्वांत कमी आहे. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत प्रकल्पांची एकूण संख्या १५ टक्क्यांनी कमी झाली आहे आणि अनावरण केलेल्या नवीन युनिट्सची संख्या ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. हे अपेक्षित होते. याच कालावधीत प्रीमियम प्लस (५,७२१ रूपये आणि ७,१५१ रूपये पीएसएफच्या दरम्यान) आणि लक्झरी (७,१५१ रूपये पीएसएफपेक्षा जास्त) विभागांत अनावरण झालेल्या प्रकल्पांच्या संख्येत वाढ झाली आहे.