Monday, December 9, 2024
Home ताज्या कोल्हापूर शहराची हददवाढ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ...

कोल्हापूर शहराची हददवाढ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन  

कोल्हापूर शहराची हददवाढ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सा.ऊ) मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूर महापालिकेला भेट देऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोल्हापूर शहराची हददवाढ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु असे आश्वासन दिले. त्याचबरोबर महापालिकेने फेरीवाले पुनर्वसनासाठी जे उद्दिष्ट दिले होते त्यांनी हे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. सदरची बैठक महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, उर्वरीत विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ योगेश जाधव, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राज्याच्या नगरविकासच प्रधान सचिव महेश पाठक, खासदार संजय मंडलीक, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.
शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही नामदार एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच कोल्हापूर शहराची हददवाढ करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करु यासाठी शासनाकडे फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या. शाहू मिल इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करु. छ.शाहू समाधी स्थळाच्या आर्ट गलरीसाठी आणि सुशोभीकरणासाठी नगरविकासमधून आवश्यकतो निधी उपलब्ध करून देऊ. कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलाव सुशोभिकरण करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून निधी उपलब्ध करुन देऊ असे सांगितले.
प्रारंभी पी.एम.स्वनिधी अभियानाअंतर्गत मे.बी डिजीटल या कॅम्पेनचा शुभारंभ ऑनलाईन स्थायी समिती सभागृहातून अंबाबाई मंदीर बँक ऑफ इंडिया शाखेतील करण्यात आला.उपायुक्त निखिल मोरे यांनी यावेळी मंत्री महोदयांना स्लाईड शोद्वारे महापालिकेने उल्लेखनिय केलेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये पीएम स्वनिधी कर्ज योजनेत महापालिका राज्यात अव्वल असल्याचं सांगितलं. क्षयरोग नियंत्रण व निमुर्लन कार्यक्रमात राज्यात अव्वल. सफाई सुरक्षा चॅलेंज अंतर्गत राज्यात सर्वांत प्रथम हेल्पलाईन नंबर सुरु. महापालिका शाळेतील विदयार्थ्यी स्कॉलरशिपमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकले. आयसोलेशन हॉस्पीटल कोव्हीडसाठी दोन महिन्यात उभे केले असलेचे सांगितले. यानंतर महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. यामध्ये थेट पाईपलाईन पाणी योजना, अमृत पाणी पुरवठा वितरण योजना, महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरु असलेली कामे, पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु असलेचे सांगितले. क्रीडा क्षेत्रासाठी खेलो इंडिया या अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम इथं टर्फ मैदान करण्याचे काम सुरू आहे. टर्न टेबल लॅडरसाठी वर्कऑर्डर दिलेली आहे. नेमबाजांना प्रोत्साहन देण्याबरोबरच नवीन नेमबाज निर्माण व्हावे यासाठी अडीच कोटी खर्च करून अत्याधुनिक शूटिंग रेंज उभा करण्यात आलेली आहे. महापालिका इमारत ही ऐतिहासिक वारसा असलेले आहे त्यामध्ये बदल करणे शक्य नाही त्यामुळं महपालिकेने आरक्षित केलेल्या निर्माण चौक येथील जागेमध्ये महापालिकेची प्रशस्त इमारत बांधण्यासाठी ६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी  आवश्यक तो निधी मंजूर करावा अशी विनंती केली.
यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत अनिल पुरेकर, अविनाश कांबळे यांना प्रतिनिधी स्वरुपामध्ये पीपीई किटचे वाटप करण्यात आले. कोरोना योध्दा म्हणून उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रशासकीय वैदयकिय अधिकारी डॉ प्रकाश पावरा, डॉ.विदया काळे, डॉ.रमेश जाधव, नर्स राणी मिनचेकर, लॅब टेक्निशियन मीनल पाटील, अशा सेविका शाहिन मिरशिकारी. त्याचबरोबर पी एम स्व निधी अंतर्गत भारत नांगरे, विनायक जाधव या दोन फेरीवाल्यांना दहा हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.
राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी माझे प्रशिक्षण इथंच झालं त्यामुळं कोल्हापूरशी माझे वेगळे नाते असलेचे सांगिले. शहराच्या हद्दवाढीसाठी लोकप्रतिनिधींना घेऊन प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करा. १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतील रक्कमेवरील व्याजाची रक्कम इतर खर्च करण्यासाठी परवानगी दिलेचे सांगितले. पाणी पुरवठा थेट पाईपपाईन योजनेचे काम जसजसे पूर्ण होईल तसतसे पुढील रक्कम महापालिकेला दिली जाईल. केएमटी साठी नवीन योजना आली आहे. केंद्राकडून आणि राज्याकडून ही नवीन योजना लवकरच सुरू करण्यात येईल.
राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेची जे प्रकल्प राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत त्यासाठी आज आढावा घेतला असल्याचं सांगितले. आंम्ही मुद्दाम इथे आलो काही गोष्टी मुंबईत शक्य होत नाहीत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या अडचणी आहेत त्या निदर्शनात आल्या पाहिजेत म्हणून इथं येऊन बैठक घेतली आहे. सर्वसमावेशक निर्णय घेत असताना सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेत आहोत. राज्य सरकारने घेतलेले निर्णय हे लोकांवर प्रतिबिंब उमठावणारे असतात ते लोकांपर्यंत पोचवा. कोल्हापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे या शहरातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते राज्य शासनाकडे पाठवा ते तात्काळ सोडवू, तर महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे कामही लवकर करू.  रंकाळा हे चांगले पर्यटन स्थळ आहे ते अतिशय चांगले करू, रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी आवश्यक तो निधी देऊन रंकाळा सुशोभित करू अशी ग्वाही दिली. शाहू मिल इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चांकरून कॅबिनेट बैठकीत चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ.
माजी महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी शाहू महाराजांनी बांधलेली जी बोर्डिंग्ज आहेत तीचे संवर्धन करण्यासाठी खास बाब म्हणून या इमारतींची डागडुजी करून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्धक करुन दयावा अशी मागणी केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा.आयुक्त विनायक औंधकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी केले. यावेळी सहा.आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी परिवहन समिती सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नियाज खान, राहुल चव्हाण, सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, नगरसचिव सुनिल बिद्री व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं...

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९...

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन   कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट...

Recent Comments