इचलकरंजी नगरपालिकेसमोर एका महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून केला आत्मदहनाचा प्रयत्न
इचलकरंजी/प्रतिनिधी : इचलकरंजी नगरपालिकेसमोर सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भोरे या सामाजिक कार्यकर्त्यांना आत्मदहन केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा एका महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली गाळ्याचे बांधकामाला पालिकेने अटकाव केला असता गाळेधारक महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळील मुव्हेकेल गाळे मंजूर झाले आहे. पण गाळेधारक मुव्हेकेल ऐवजी पक्के बांधकाम केले जात आहे. त्याला पालिकेचे मुख्याधिकाऱ्यानी बांधकाम करु नये, याबाबतचा चार दिवसापूर्वी आदेश काढला आहे. तरीदेखील गाळेधारक शनिवारी सकाळी गाळ्याचे बांधकाम करु लागले. त्याला पालिकेने अटकाव केला असता गाळेधारक महिलेने स्वतः च्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसानी संबंधीत महिलेच्या दिशेने धाव घेवून वेळीच डिझेलचा कॅन काढून घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
यावेळी गाळेधारक व पालिकेच्या अधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या वादावादीमुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घडला प्रकाराने जलशुद्धीकरण केंद्राजवळील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पालिकेने अग्निशमक दलाचा एक पाण्याचा बंब व रुग्णवाहिका देखील ठेवली आहे. दरम्यान प्रत्येक गोष्टीवर आत्मदहन हा एकमेव पर्याय आहे का या गोष्टीचा देखील विचार करणे गरजेचे आहे