स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी सर्व स्तरावर पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय तसेच अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भारतभर सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
डीजीटी नवी दिल्ली ने नुकतीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची [ आयटीआय ] ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वाढीव मुदत दि. २३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त असल्याचे जाहिर केले आहे.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर संचलित औद्यागिक प्रशिक्षण संस्था व मुलभूत प्रशिक्षण केंद्रात गेल्या अनेक वर्षापासून उत्तम व्यावसायिक शिक्षण व गुणवत्तावर आधारित प्रात्याक्षिक व्यवसायाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.यातील खास बाब म्हणजे एक वर्ष मुदतीचा वेल्डर [ गॅस व इलेक्ट्रिक ] व सीएनसी प्रोग्रामर कम ऑपरेटर या व्यवसायात ही मुलींना प्रवेशासाठी विशेष प्राधान्य दिले जात आहे.
त्याच बरोबर संस्थेमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, ड्राफ्टस्मन (मॅकेनिकल )व मशिनिष्ट या व्यवसायात देखील प्रशिक्षण दिले जाते आहे.
स्मॅक आयटीआय मध्ये गरजू मुलींना व युवकांना फी मध्ये विशेष सवलत दिली जात असून दहावी पास किंवा नापास मुली व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांना कुशल कारागीर बनवण्याचे कार्य अविरतपणे चालू आहे. अशा अनेक मुले व मुली या कोर्सनंतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत व त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधीही उपलब्ध होत आहेत.
तरी दि. २३ ऑक्टोंबर २०२४ पर्यन्त गरजू मुली व युवकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत शासनाने दिली असून अर्ज भरलेल्या उमेदवारांनी दि. ३० ऑक्टोंबर २०२४ पर्यन्त संस्थेमध्ये उपस्थित राहून आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन, स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके व प्राचार्य प्रसन्न वरखेडकर यांनी केले आहे.