Wednesday, November 20, 2024
Home ताज्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डी.वाय. पाटील.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डॉ.डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले. २४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, ज्यात डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स अँड मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणे डी.वाय.पाटील विद्यापीठ, पुणे येथील डॉ.पद्मश्री डीवाय पाटील विद्यापीठ, नवी मुंबई डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय नवी मुंबईचे डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी पुण्यातील डॉ.डी.वाय.पाटील नॉलेज सिटी,डॉ. डी. वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, मुंबई डीवाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, नागपूर डॉ डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, कांगडा (हिमाचल प्रदेश)डी वाय पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर पुण्यातील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल , मुंबई डी..वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, बेल्जियम,डॉ डी वाय पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पुणे,डी.वाय.पीडीसी सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह रिसर्च अँड स्टडीज,डॉ. डी.वाय.पाटील पुष्पलता पाटील इंटरनॅशनल स्कूल, पाटणा,डॉ डी.वाय. पाटील बी-स्कूल, पुणे,डॉ.डी.वाय.पाटील बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फर्मेटिक्स इन्स्टिट्यूट, पुणे आदी संस्थांची उभारणी त्यांनी केली.                                                               डॉ. डी.वाय.पाटील १९५७ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून कोल्हापूर नगरपरिषदेवर निवडून आले आणि १९६२ पर्यंत ते या पदावर राहिले. १९६७-७८ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . १९६७ आणि १९७२ या दोन्ही निवडणुकांमध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. २१ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांची त्रिपुरा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आणि २७ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ९ मार्च २०१२ रोजी त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.इंदिरा गांधी यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याचा किंवा संजय गांधींशी असलेल्या मैत्रीचा राजकीय लाभ घ्यावा असे डी.वाय. पाटील यांना त्यावेळीही वाटले नाही, आणि तो घेतला नाही त्याबद्दल आजही खंत वाटत नाही. किंबहुना त्यांची तशी प्रवृत्ती नव्हती आणि नाही. त्यामुळेच राजकारणात ते रमले नसावेत.डॉ. डी. वाय. पाटील यांची मंत्रिपदाची पहिली संधी हुकली नसती, तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकले असते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यातला पोत बदलून गेला असता. १९७८ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे त्या संधीने पुन्हा पाठ फिरवली. पुढच्या पराभवानंतर त्यांचा राजकारणातला रस हळुहळू कमी होत गेला आणि ऐन उमेदीत त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला.पन्नास हे ख-या अर्थाने राजकारण सुरू करण्याचे वय असते. परंतु डी. वाय. पाटील यांनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी राजकारणाचा त्याग करून आजच्या काळात विश्वसनीय वाटणार नाही, असे धाडस केले.एकदा राजकारणाचा चस्का लागला की मरेपर्यंत त्याचा मोह सुटत नाही, असे आपल्याकडील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. परंतु डी. वाय. पाटील हे वेगळेच आहेत. त्यांनी ते धाडस दाखवले आणि सक्रीय राजकारणाचा पुन्हा स्वप्नातही विचार केला नाही.                        राजकारण सोडल्यानंतरच्या उर्वरित आयुष्यात त्यांनी जे काही उभे केले, ते एका व्यक्तिला नव्हे, तर एका सरकारलाही शक्य होणार नाही एवढे प्रचंड आहे.सरकारच्या आणि सरकारमधल्या दूरदृष्टीच्या लोकांच्या पाठिंब्यावरच त्यांचे सगळे शैक्षणिक साम्राज्य उभे राहिले असले तरी ते उभे करण्यासाठी जी दृष्टी आणि जिगर असावी लागते, ती एखाद्याच डी. वाय. पाटील यांच्याकडे असू शकते.कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्यासारख्या ऋषितुल्य माणसांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम डी. वाय. पाटील यांच्यासमोर होते. किंबहुना ते पाहात, त्यांच्या त्यागाच्या गोष्टी ऐकतच ते मोठे झाले. डी. वाय.पाटील यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कर्मवीर आणि बापूजींच्या काळातल्यासारखी परिस्थिती नव्हती. शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचली होती. शिवाजी विद्यापीठासारख्या विद्यापीठामुळे खेड्यापाड्यातल्या मुलांना उच्च शिक्षणाचे दरवाजेही खुले झाले होते. परंतु हे सगळे शिक्षण पारंपरिक पठडीतले होते.वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी मर्यादित जागा होत्या आणि उच्च प्रतीच्या गुणवत्तेमुळे तिथे ठराविक वर्गातील मुलांचीच मक्तेदारी होती. ही कोंडी फोडली वसंतदादा पाटील यांच्यासारख्या अवघी सातवी इयत्ता उत्तीर्ण असलेल्या मुख्यमंत्र्यांनी. राज्यात विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण आणले आणि खेड्यापाड्यातल्या मुलांना वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आणि विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण राबवले. परंतु सहकाराची कोणतीही ताकद नसलेल्या डी. वाय. पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्यांनी हे धोरण प्रभावीपणे आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून राबवले. वसंतदादा पाटील यांनी जे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी पुढे शरद पवार य़ांच्यासारख्या दूरदृष्टीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर अधिकची जबाबदारी सोपवली, ती त्यांनी उत्तमपणे पार पाडली. राज्याच्या प्रमुख शहरांमधून संस्थांचा विस्तार केला.                                              Bडी. वाय. पाटील यांनी नेपाळ, मॉरिशसमध्ये शिक्षणसंस्था काढल्या त्याची खूप चर्चा झाली. परंतु ती चर्चा त्यावेळी तेवढ्यापुरतीच झाली. डी. वाय. पाटील ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील असामी बनली. किंवा त्यांचे साम्राज्य देशाबाहेर विस्तारले आहे, बिहारमधील उच्च शिक्षणाची सगळी व्यवस्था किडली होती. आधीच्या राज्यपालांनी पैसे घेऊन कुलगुरूंच्या नेमणूका केल्या होत्या, त्याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. दरम्यान डी. वाय. पाटील यांची त्रिपुराहून बिहारमध्ये राज्यपाल म्हणून बदली झाली. त्यांनी तिथल्या उच्च शिक्षण व्यवस्थेला जी काही शिस्त लावली,त्यामुळे नीतिश कुमार यांच्यासारखे मुख्यमंत्रीही थक्क झाले होते. जिथे जायचे तिथे तिथले होऊन काम करायचे, उत्तमातले उत्तम रिझल्ट द्यायचे, ही डी. वाय. पाटील यांच्या कामाची पद्धत आहे, ती त्यांनी राज्यपाल पदावरूनही दाखवली. त्रिपुरासारख्या गरीब राज्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करताना त्यांनी केंद्रातील ओळखींचा उपयोग करून पॉवर प्रोजेक्ट मंजूर करून घेणे, त्रिपुराला एज्यूकेशन हब बनवण्यासाठी प्रयत्न केले. राज्यपालपद हे केवळ वृद्धापकाळ आरामात व्यतीत करण्यासाठी नसते, तर राज्याच्या विकासात तेही योगदान देऊ शकतात, हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. अवघा एक रुपया मानधन घेऊन काम करणारा हा राज्यपाल देशाच्या इतिहासात विरळाच म्हणावा लागेल.बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण जिद्दीच्या बळावर काय करू शकतो, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. सधन शेतकरी कुटुंबातील लाडात वाढलेला मुलगा, बेदरकार तरूण, राजकारणात झोकून देऊन काम करणारा नेता, राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांशी मैत्र जोडणारा कार्यकर्ता, कर्जबाजारी शिक्षण संस्थाचालक ते शिक्षण क्षेत्रातील प्रचंड मोठ्या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट अशी अनेक वळणे त्यांच्या आयुष्याला आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये जिवाभावाच्या माणसांचा गोतावळा मात्र सतत त्यांच्या सभोवती राहिला. त्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतिबिंब डॉ. संजय डी पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसते, तर त्यांनी अर्ध्यात सोडलेला राजकीय प्रवास सतेज पाटील आणि नातू ऋतुराज पाटील यांनी पुढे सुरू केला आहे.त्यांच्या अफाट कार्यकर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments