कोल्हापूमधील ट्रॅक्टर रॅलीत केंद्राच्या कृषी धोरणावर राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांनी साधला निशाणा
भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली
कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅली येथील निर्माण चौक ते दसरा चौक अशी काढली या रॅलीत १००० हजार हुन अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. या रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे प्रभारी
एच. के. पाटील म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलत आले असून, खोटं बोलूनच सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे शोषण होणारे कायदे पास केले आहेत. मात्र, आता त्यांना शेतकऱ्यांच्या अक्रोशाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या सरकारने नुकतेच २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. नागरिकांना वाटले काहीतरी मदत मिळेल, मात्र अजून १ पैसा सुद्धा कोणाला मिळाला नाहीय. त्यामुळे त्यांनीच आता २० लाख कोटी कुठे आहेत हे सांगावे? असे आव्हान काँग्रेसच्या वतीने एन. एच. पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिले आहे. तर कृषी विधेयकाविरोधात कोल्हापुरात काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली; केंद्राच्या धोरणावर पाटील यांनी निशाणा साधला आहे.
कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयकं मंजूर करुन घेतली. लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.याचाच एक भाग म्हणून आज ही रॅली काढण्यात आली आहे असे सांगितले.
या ट्रॅक्टर रॅलीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शिवाय मोठ्या शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने आपले ट्रॅक्टर घेऊन रॅलीमध्ये उपस्थिती लावली होती.
केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी कायदा आणून मोदी सरकार आपल्या अन्नदात्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे.भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी या काळ्या कायद्यांविरोधात आज ही रॅली काढली गेली.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हम करे सो कायदा ही पंतप्रधान मोदी यांची कामाची पद्धत आहे कृषी कायद्याच्या बाबतीतही त्यांनी हेच केले आहे पंजाबने कायदे न करून स्वतःचे स्वतंत्र कायदे मंजूर केले त्याप्रमाणे महाराष्ट्रातील कायदे व्हावेत या कायद्याविरुद्ध गाव तालुका जिल्हा पातळीवर प्रबोधन शिबिर घेऊन शेतकऱ्यांना जागे करा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा मोदी सरकारचा डाव लक्षात आल्याने देशभरात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक सुरू झाला आहे सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांना लुबाडून गुजरात मधील उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी भाजपने हे कुटील कारस्थान रचले आहे तो जनतेने उधळून टाकावा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना जमीन ही शेतकऱ्यांसाठी आई समान असते तीच काढून घेण्याचे कारस्थान भाजपने केले आहे शेतकऱ्यांचा गळा अवळणारा हा कायदा आहे जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आता जागे व्हायला हवे नाही तर पुढच्या पिढ्या कधीही त्यांना माफ करणार नाही असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले.
संपूर्ण रॅलीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्रॅक्टरचे सारथ्य केले. निर्माण चौक येथे राहिला सुरुवात झाली जवळजवळ एक हजार ट्रॅक्टर यामध्ये सहभागी झाले होते ही रॅली संभाजी नगर मार्गे दसरा चौक अशी काढण्यात आली दसरा चौक मध्ये सभेचे रूपांतर झाले आणि यावेळी या सर्व मान्यवरांनी सरकारवर निशाणा साधला.यावेळी डी. एम. संदीपकुमार, बामसी रेड्डी, देविदास भन्साळी, आ पी एन पाटील, आ ऋतुराज पाटील, आ चंद्रकांत जाधव, आ राजूबाबा आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हापरिषद अध्यक्ष बजरंग पाटील, दिनकरराव जाधव, कर्णसिह गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, सरलाताई पाटील, सुरेश कु-हाडे, तौफीक मुल्लाणी ,संध्या घोटणे , जयराम पाटील, कॉंग्रेसचे तालूकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.