टेलिफोन विषयक तक्रारीसंदर्भात खासदार मंडलिक यांचे उपस्थितीत आज ६ रोजी आढावा बैठक
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागामध्ये बीएसएनएलसह इतर खाजगी कंपन्यांची रेंज पोहचत नसलेकारणाने यासंदर्भात एकत्रीतपणे आढावा घेणेकरीता खासदार संजय मंडलिक यांनी सर्किट हाऊस कोल्हापूर येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीस आम.प्रकाश आबिटकर, आम. राजेश पाटील यांचेसह बीएसएनएल व खाजगी टेलिफोन कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, पन्हाळा येथील डोंगराळ व दुर्गम भागामध्ये मोबाईलला नेटवर्क मिळत नसलेकारणाने या विभागातील सर्व ग्राहकांची फार गैरसोय होत आहे. कोविड साथरोगामुळे सध्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु असताना यातच त्यांना रेंज मिळत नाही, तसेच बँका एकमेकांना इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकाला कनेक्ट असतात त्यांनाही याचा फटका बसत आहे. कॅाल ड्रोप होणे, मोबाईल रेंज व्यवस्थित न मिळणे आदी विषयांवर चर्चा करुन यातून ग्राहकांना कशा प्रकारे चांगली सेवा देता येईल.याबाबतची बैठक आज (शुक्रवार दि.६ ) शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आयोजीत केली आहे