गीता पाटील यांचा जागतिक शिक्षक दिन पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर : शिरोली पुलाची, ता. हातकणंगले येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या गीता गणपतराव पाटील यांना जागतिक शिक्षक दिन पुरस्काराने सन्मानित केले. खोपोली येथ झालेल्या कार्यक्रमात पी स्क्वेअर इंटरनॅशनलचे संस्थापक प्रसाद शृंगारपुरे यांच्या हस्ते गीता पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जागतिक शिक्षक दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, वर्ल्ड जेनेसिस फाउंडेशन व यूएस. युनेस्को क्लब, केंद्रे आणि संघटनांचे फेडरेशन यांच्या महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांचा गौरव करण्यात आला.
उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञानाने परिपूर्ण करणारे विविध उपक्रम, विविध बाह्य परीक्षा, कला व क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससी सारखे अद्यावत तंत्रज्ञान परिपूर्ण शिक्षण आणि विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश या निकषांच्या आधारे सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या गीता पाटील यांना जागतिक शिक्षक दिन पुरस्काराने गौरवण्यात आले.
हा सन्मान ऊर्जा देणारा आहे. पालकांचा विश्वास आणि शिक्षकांची साथ यामुळेच शाळेत विविध उपक्रम यशस्विनी राबवणे शक्य आहे. याची दखल जागतिक संस्थेने घेतली, ही बाब आनंददायी आहे असे मत गीता पाटील यांनी व्यक्त केले.
l