ए.जी.कोरगावकर पेट्रोल पंपास उच्चांकी ऑइल विक्रीमध्ये मिळाला प्रथम पुरस्कार
कोल्हापूर /प्रतिनिधी : शिरोली (पुलाची) सांगली फाटा येथे गेला ६३ वर्षापासून कार्यरत असलेल्या ए.जी. कोरगावकर पेट्रोल पंपास सन २०२१-२२ सालातील उच्चांकी ऑइल विक्रीचा प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सामाजिक कार्यकर्ते कै. आनंदराव गोविंदराव कोरगावकर यांनी १९५७ साली स्थापन केलेल्या व्यवसायाने गेली ७ वर्षे महाराष्ट्र व भारतामध्ये पेट्रोल डिझेल विक्रीमध्ये उच्चांक विक्रीचा बहुमान मिळवण्यात व सातत्य ठेवण्यात यश मिळवले आहे. बेंगलोर येथे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ऑइल विक्री दक्षिण महाराष्ट्र (वास्को रिजन) विभागात ए. जी. कोरगावकर पेट्रोल पंप उच्चांकी असल्याने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले. यावेळी पंपाच्या वतीने आशिष कोरगावकर व श्रद्धा कोरगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.या कार्यक्रमास हिंदुस्थान पेट्रोलियमचे ई.डी. रिटेल संदीप माहेश्वरी, सीजीएम सी.एक एच.श्रीनिवास,जी.एम. लक्ष्मणराव अकेला आदी उच्च अधिकारी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर आदित्य अग्रवाल व चिफ रिजनल मॅनेजर प्रिन्स जिंदाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रथम क्रमांकाच्या मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अमोल कोरगावकर व कुटुंबीय यांनी हिंदुस्थान पेट्रोलियमचे आभार व्यक्त केले आहे.