भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष बी. फार्मसी वर्गातील विद्यार्थी व पालक यांना फार्मसी अभ्यासक्रम, उच्चशिक्षण तसेच नोकरीच्या संधी इत्यादी बाबींची माहिती देण्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते.कार्यकमाचे उदघाटन महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे व निमंत्रित पालक यांच्या शुभहस्ते राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती मा. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्या फोटो पुजन व दीपप्रज्वलनाने झाले. सर्वप्रथम नवीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पालकांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्राचार्यानी ‘भारती विद्यापीठाची माहिती दिली तसेच ” गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन ” या ब्रीद वाक्यास अनुसरून पाल्यास फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्याबाबत महाविद्यालय कटिबध्द असल्याचे सांगीतले. यावेळी या वर्षापासुन सर्व भारतात एकाच पध्दतीचा नवीन पी सी आयचा फार्मसी अभ्यासकम, परिक्षा पध्दती व त्यासंदर्भात असलेले शिवाजी विद्यापीठाचे नियम, तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षकवर्गाची, कॉलेजमधील विद्यार्थी मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, माजी विद्यार्थी संघटना अशा विविध समित्यांची माहिती दिली. पाल्याचा सर्वागीण विकास व्हावा यादृष्टीने कॉलेज तर्फे राबविण्यात येणारे क्रीडा , सांस्कृतीक व सामाजिक उपक्रमाची माहिती प्राचार्याकडून देण्यात आली विद्यार्थ्यांची करिअर मध्ये योग्य दिशेने यशस्वी व सकारत्मक वाटचाल होण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे असे प्राचार्यानी नमूद केले.
अकॅडमीक इन्चार्ज श्री. आर.जे. जरग यांनी बी . फार्म प्रथम वर्षाची अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना आपला परिचय करून दिला. कार्यकमाच्या शेवटी विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. कार्यकमाचे सुत्रसंचालन प्राध्यापिका. पी. एस. टकले तर आभार प्राध्यापिका. व्ही. के काकाडे यांनी मानले.या कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन प्रतिसाद दिला.