Wednesday, September 11, 2024
Home ताज्या कसबा बावड्यात महिलेचे शीर धडावेगळे करून निर्घृण खून, परिसरात खळबळ

कसबा बावड्यात महिलेचे शीर धडावेगळे करून निर्घृण खून, परिसरात खळबळ

कसबा बावड्यात महिलेचे शीर धडावेगळे करून निर्घृण खून, परिसरात खळबळ

कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावड्यामध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका महिलेचे धारदार शस्त्राने शीर धडावेगळे करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.कविता प्रमोद जाधव (वय ३८, रा. कसबा तारळे ता. राधानगरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संशयित आरोपी राकेश शामराव संकपाळ (वय. 30, रा. लाईन बझार, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मिळालेली माहिती अशी कि, राकेश संकपाळ याचा फर्निचरचा व्यवसाय असून तो विवाहित आहे. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा परिसरातील लाईनबझार येथे राकेश संकपाळ याने कविता जाधव हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून शीर धडावेगळे करून निर्घृण खून केला. यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करुन ताराराणी पुतळा येथे राकेशला ताब्यात घेतले.त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments