केआयटी महाविद्यालयाला एनसीसी युनिटची मान्यता,एनसीसी युनिट असणारे जिल्हयातील पहिले इंजिनिअरींग महाविद्यालय
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुटऑफटेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूरला 1 महाराष्ट्र आर्टिलरी बॅटरी एनसीसी युनिटची मान्यता नुकतीच मिळाली. त्याबाबतचे पत्र कमांडिंग ऑफिसर लेफटनंट कर्नल एस.बी.सरनाईक यांनी केआयटी महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
केआयटीने विद्याथ्र्यांची मागणी व अभियांत्रिकी विद्याथ्र्यांचा शासकीय सेवा विशेषत: सैनिकी सेवेमध्ये असलेला रस लक्षात घेता केआयटीने मार्च 2020 मध्ये एनसीसी युनिटची मागणी करणारा अर्ज केला होता. त्यानुसार 80 विद्याथ्र्यांची क्षमता असलेले स्वयंअर्थसहाय्यित वरिष्ठ युनिट केआयटीमध्ये सुरु करण्याची परवानगी केआयटीला मिळाली.
एनसीसी युनिटची परवानगी असलेले कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील केआयटी हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. सध्या महाविद्यालयात एनएसएस, लिड इंडिया, शौर्य यासारख्या विद्यार्थी क्लबच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना एसएसबी, एनडीए, युपीएससी अशा परीक्षांची माहिती दिली जाते आणि बरेच विद्यार्थी यशस्वी देखील झाले आहेत. परंतू या एनसीसी युनिटच्या परवानगीने विद्याथ्र्यांच्या तयारीमध्ये सुसूत्रता, शिस्त यांची मदत होईल असे मत केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी व्यक्त केले. प्रा. अमर काटकर यांची एनसीसी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून हे एनसीसी युनिट विद्याथ्र्यांसाठी सक्रीय असेल. हेयुनिट केआयटीला मिळावे म्हणून केआयटीचे विश्वस्त कर्नल प्रतापसिंह रावराणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. व प्रा. विजय रोकडे शारीरीक शिक्षण संचालक यांनी प्रयत्न केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी व सचिव श्री. दिपक चौगुले व इतर विश्वस्त यांनी संस्थेचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या व विद्याथ्र्यांनी यासंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.