केआयटीच्या प्रा. पल्लवी पाटील यांना पीएचडी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूर मधील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक पल्लवी पाटील यांनी विश्वेश्वरय्या तंत्रनिकेतन विद्यापीठ, बेळगांव येथून बायोटेक्नॉलॉजी अभियांत्रिकीमधील पीएचडी संपादित केली.
पीएचडीच्या अभ्यासासाठी ‘स्टडीज ऑन डेव्हलपमेंट ऑफ वाइन फ्रॉम शुगरकेन अँड फ्रुट ज्यूस युजिंग यीस्ट स्पेसीज’ हा विषय होता. त्यांना त्यांचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. उमेश देशन्नवर केलई, बेळगांव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभाग प्रमुख प्रा. ऋतुपर्ण करकरे व सहकारी यांचेही सहकार्य लाभले.
डॉ. पल्लवी पाटील यांना केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले व महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार यांचे प्रोत्साहन लाभले आहे.