केआयटी व एनएचएआय यांच्यात सामंजस्य करार प्रकल्प आधारित अध्ययन पध्दत व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणार काम
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर (ग़्क्तॠक्ष्) (भारत सरकार) यांच्यामध्ये प्रकल्प आधारित अध्ययन व गुणवत्तापूर्ण शिक्षण या क्षेत्रातील कामासाठी सामंजस्य करार झाला. या कराराबाबतची माहिती केआयटीचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी दिली.
या करारांतर्गत आर्थिक, शैक्षणिक, प्रशासकीय सुधारणांसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर केआयटीला मार्गदर्शन व सहकार्य करणार आहे. भविष्यातील सदृढ अभियंता घडविण्यासाठी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रमांची शृंखला नियोजित आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूरच्या तज्ञांबरोबर केआयटीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना संयुक्त संशोधन प्रकल्प राबविता येतील.
या करारामध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांसाठी ट्रान्स्पोर्टेशन इंजिनिअरींग या विषयामध्ये असणारे आधुनिक प्रात्यक्षिके, फिल्ड ट्रेनिंग, इंटर्नशिप प्रोग्रॅम, साईट व्हिजीट, अभ्यासक्रमामध्ये असणारा गॅप अॅनॉलिसीस इ. साठी बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार आहे.
या अनुभवाचा फायदा केआयटीचे विद्यार्थी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर यांना व्हावा या उद्देशाने हा करार झाला आहे. या करारासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर च्या वतीने वसंत पंदरकर (डीजीएम –प्रोजेक्ट डायरेक्टर), चंद्रकांत भरडे, प्रवीण गवळी उपस्थित होते. यावेळी केआयटीच्या वतीने मा. विश्वस्त श्री. दिलीप जोशी, संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, सिव्हील विभागप्रमुख प्रा. एम. ए. चव्हाण, पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. अक्षय थोरवत, प्रा. हेमंत सडोलीकर, प्रा. रवी निकम, प्रा. शीतल वरुर, प्रा. गुरुराज कत्ती उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. रश्मी शंकर गौडा यांनी केले. या करारासाठी केआयटीचे चेअरमन भरत पाटील, व्हा. चेअरमन सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले व इतर संचालक यांनी केआयटीचे अभिनंदन केले.