Monday, December 30, 2024
Home ताज्या शाहुमिल मधील प्रदर्शन पाहून भारावून गेल्या यशस्विनी राजे

शाहुमिल मधील प्रदर्शन पाहून भारावून गेल्या यशस्विनी राजे

शाहुमिल मधील प्रदर्शन पाहून भारावून गेल्या यशस्विनी राजे

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त ” लोकराजा  कृतज्ञता पर्व ” अंतर्गत आयोजित केलेल्या प्रदर्शनास आज यशस्विनी राजे छत्रपती यांनी भेट दिली. कोल्हापूरच्या तरुण पिढीने हे प्रदर्शन पाहून समजून घेतले तर शाहूंचे विचार आणि कार्य समजून घेता येईल असे मत व्यक्त केले.
छत्रपती घराण्याच्या वंशवृक्ष आणि आपल्या पूर्वजांच्या प्रतिमा , त्याखालील मजकूर काळजी पूर्वक वाचत ,अनेक दुर्मिळ फोटो बाबत  चिकित्सक चर्चा करत होत्या. शाहू महाराजांच्या आई,आजी , पणजी यांच्या फोटो सह अनेक दुर्मिळ फोटोचा फोटो त्यांनी आपल्या संग्रही मोबाईल मध्ये घेतला.                                                                      शाहू मिलचा पायाभरणी च्या  दगडावरील मजकूर , फोटो तील ठिकाण , व्यक्ती , विविध आदेशातील मजकूर अभ्यासपूर्वक समजून घेत होत्या. प्रदर्शन पहाण्यासाठी आलेल्या आलेल्या वयोरुध्य दुर्गुळे आजीची आस्थेने विचारपूस करत पुढे झाल्या. गंगावेशीत आम्हाला राजाराम महाराजांनी जागा दिली, घर दिली असे आजींनी सांगितले . मालोजी राजे ची कन्या आहे असे समजताच आजींनी हात जोडले त्यावेळी दोघीही सदगदित झाल्या.
एकाच वेळी शंभर चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रं बारकाईने पाहत होत्या. खाद्य महोत्सव आयोजित केलेल्या बचत गटाच्या महिलांशी विचारपूस करत त्याच्या पदार्थांची चव चाखली.यावेळी प्रमोद पाटील , ऋषिकेश केसकर , उदय गायकवाड  ,आदित्य बेडेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

तपोवन मैदानावर दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ चार दिवस सतेज कृषी प्रदर्शन सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली...

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

Recent Comments