Tuesday, October 15, 2024
Home ताज्या एक लाख १४ हजार ४९१ शालेय विद्यार्थ्यांचे कथाकथनातून लोकराजास अभिवादन

एक लाख १४ हजार ४९१ शालेय विद्यार्थ्यांचे कथाकथनातून लोकराजास अभिवादन

एक लाख १४ हजार ४९१ शालेय विद्यार्थ्यांचे कथाकथनातून लोकराजास अभिवादन

कोल्हापूर /प्रतिनिधी : लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय असून त्यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी स्मृती शताब्दी पर्वात आज शालेय स्तरावर छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगावर आधारित कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील १ हजार ९६७ शाळामधील १ लाख १४ हजार ४९१ विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी कथाकथनातून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले.
शालेय स्तरावरील कथाकथन स्पर्धेत आजरा तालुक्यातील ७२ शाळेतील ६ हजार ९२४ विद्यार्थी, भूदरगड तालुक्यातील ८१ शाळेतील ५५६ विद्यार्थी, चंदगड तालुक्यातील १४३ शाळेतील ४ हजार २६५ विद्यार्थी, गडहिंग्लज तालुक्यातील १०३ शाळेतील ४३१ विद्यार्थी, गगनबावडा तालुक्यातील २२ शाळेतील ४२२ विद्यार्थी, हातकणंगले तालुक्यातील ३६२ शाळेतील १३ विद्यार्थी २५४ विद्यार्थी, कागल तालुक्यातील २४९ शाळेतील ४४ हजार ३६७ विद्यार्थी, करवीर तालुक्यातील ३०६ शाळेतील ४ हजार ३१० विद्यार्थी, पन्हाळा तालुक्यातील ११३ शाळेतील १० हजार ४३२ विद्यार्थी, राधानगरी तालुक्यातील ७४ शाळेतील ७०९ विद्यार्थी, शाहुवाडी तालुक्यातील ११२ शाळेतील २२४ विद्यार्थी, शिरोळ तालुक्यातील १५७ शाळेतील एक हजार २२५ विद्यार्थी आणि कोल्हापूर महापालिकेच्या १७३ शाळेतील २७ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी कथाकथन स्पर्धेत उत्सफूर्तपणे सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments