ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या माध्यमातून आपल्या विस्ताराची घोषणा केली. त्यामुळे तिच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये चार पटींनी वाढ होणार आहे. हे ईव्ही क्षेत्राच्या जगातील काही लक्षणीय विस्तारांपैकी एक असून त्यामुळे देशातील ईव्हीची उपस्थिती, सुलभता आणि वाढीला मोठी चालना मिळणार आहे. यातून ओला इलेक्ट्रिकने या क्षेत्रातील आपल्या आघाडीला आणखी बळकटी आणली आहे. सर्व्हिस सेंटरसोबत ३२०० नवीन स्टोअर्स सुरू करून कंपनी व्यापक प्रमाणात ईव्हीचा अंगीकार करण्यास चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे टिअर- १ व टिअर-२ शहरांच्या पलीकडे अगदी भारतभरातील जवळजवळ प्रत्येक शहर व तालुक्यापर्यंत ईव्हीचा प्रवेश होणार आहे. या विस्ताराच्या माध्यमातून ओला इलेक्ट्रिकने #सेव्हिंग्जवालास्कूटर या आपल्या अभियानात दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे.ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अगरवाल म्हणाले, आम्ही वचन दिले होते आणि आम्ही आता ते पाळले आहे! आजचा दिवस भारतातील ईव्हीच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे, कारण आम्ही आमचे नेटवर्क प्रत्येक शहर, गाव आणि तालुक्यापर्यंत विस्तारले आहे. आमच्या सर्व्हिस सेंटरसोबत नवीन स्टोअरच्या माध्यमातून आम्ही ईव्हींची खरेदी व मालकीच्या अनुभवाला संपूर्ण नवा आयाम दिला आहे. आमच्या #सेव्हिंग्जवालास्कूटर या अभियानातून आम्ही नवीन मापदंड स्थापन केले आहेत. आम्ही आणखी वाढत असताना नाविन्यपूर्णतेच्या कक्षा रूंदावत #एंडआईसएज च्या दिशेने देशाच्या प्रवासाला वेग देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”या नेटवर्कच्या व्यापक विस्ताराच्या निमित्ताने ओला इलेक्ट्रिकने एस१ पोर्टफोलियोवर अनेक आकर्षक ऑफर सादर केल्या असून त्या अंतर्गत २५,००० रुपयांपर्यंतचे लाभ मिळणार आहेत. या ऑफर फक्त २५ डिसेंबर २०२४ रोजी मिळणार आहेत. ग्राहक नवीनच उघडलेल्या आपल्या जवळच्या ओला स्टोअर मध्ये जाऊन एस१एक्स पोर्टफोलियोवर ७,००० रुपयांपर्यंत सरसकट सवलत मिळवू शकतात. याशिवाय ग्राहकांना १८,००० रुपयांपर्यंतचे लाभ मिळू शकतात, यात काही निवडक क्रेडिट कार्डांच्या ईएमआयवर ५००० रुपये आणि मूव्हओएसचे ६,००० रुपयांपर्यंतचे लाभ यांचा समावेश आहे.लिमिटेड एडिशन ओला एस१ प्रो सोना या नेटवर्कच्या प्रचंड विस्ताराचे निमित्त साधून लिमिटेड एडिशन ओला एस१ प्रो सोना ही सादर करण्यात आली असून त्यात अस्सल २४ कॅरेट सोन्याचे घटक आहेत. त्यामुळे सर्वच ओला स्टोअर्समध्ये मोठी गर्दी उसळली आहे आणि ही लिमिटेड एडिशन प्रीमियम स्कूटर घरी नेण्यासाठी ग्राहक # ओलासोनाकॉन्टेस्ट या स्पर्धेत भाग घेत आहेत.कंपनीने अलीकडेच आपल्या गिग आणि एस१झेड स्कूटर श्रेणी सादर करण्याची घोषणा केली. यात ओला गिग, ओला गिग प्लस, ओला एस१ झेड आणि एस१ झेड+ यांचा समावेश आहे. यांची शुभारंभाची किंमत अनुक्रमे ३९,९९९ रु. (एक्स-शोरूम), ४९,९९९ रु. (एक्स-शोरूम), ५९,९९९ रु.(एक्स-शोरूम) आणि १,६४,९९९ (एक्स-शोरूम) आहे. स्कूटर्सच्या या नवीन श्रेणीमध्ये काढता येण्याजोग्या बॅटरींसह टिकाऊ, विश्वासार्ह, परवडणारी आणि लवचिक सोल्यूशन्स आहेत. यामुळे ग्रामीण, निम-शहरी आणि शहरी ग्राहकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वापराच्या गरजा पूर्ण होतील. गिग आणि एस१ झेड मालिकेसाठी आगाऊ नोंदणी केवळ ४९९ रुपयांमध्ये खुली असून त्यांचे वितरण अनुक्रमे एप्रिल आणि मे २०२५ मध्ये सुरू होईल.