गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन केले
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कोल्हापूर उत्तरच्या नुतन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन केले.
गोवा येथे एका विवाह समारंभात पार्सेकर व जाधव यांची भेट झाली. यावेळी पार्सेकर यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीची माहिती घेतली.
पार्सेकर म्हणाले, “कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्दयावर तुम्ही निवडणूकीला सामोरे गेलात. कोल्हापूरच्या जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही आमदार झाला, याबद्दल तुमचे अभिनंदन. शहरातील विकासकामे गतीने पूर्ण करून, कोल्हापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करा, या शुभेच्छा.” यावेळी शांभवी पार्सेकर, सत्यजित जाधव, देव सावंत, प्रेमेला जाधव, डॉ. दश्मिता जाधव आदी उपस्थित होते.