Friday, December 27, 2024
Home ताज्या सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

तपोवन मैदानावर दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ चार दिवस सतेज कृषी प्रदर्शन

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास सुरुवात झाली. देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि साध्या पद्धतीने या प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली.यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज,आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आणि गोकुळचे संचालक सर्व नगरसेवक चंदगडचे काँग्रेसचे नेते गोपाळ पाटील,जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे, कृषी संशोधन केंद्रचे डॉ.अशोक पिसाळ, कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तपोवन मैदानावर गर्दी केली होती.                                              या प्रदर्शनात देश विदेशातील विविधनामांकित कंपन्यांचे २०० हून अधिक स्टॉल स्टॉल लावण्यात आले आहेत. याचबरोबर पशुपक्षी दालन उभे करण्यात आले आहे.शेतकरी आपला तांदूळ घेऊन आले आहेत. विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान,नवीन अद्ययावत मशिनरी याठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.या प्रदर्शनात १५०० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा रेडा आकर्षण असणार आहे.प्रदर्शनाचे २०२४ हे ६ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,२०० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग आहे.शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र याठीकणी होणार आहेत.विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते खरेदी करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.फुलांचे प्रदर्शन व विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.                                                                 देशातील आघाडीच्या संशोधन पर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले,स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील विविध संस्था सहभागी झाल्या आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघ, पाटील ऑईल मशीन,प्रथम पेस्ट,ओंकार बंब जय इंडस्ट्रीज मयुरेश टेकनॉलॉजी गोविंद मिल्क सातारा, कृष्णा सेल्स , बॅगमार्क इंडस्ट्रीज, धनलक्ष्मी आटा चक्की, चेतन मोटर्स,रॉयल इन्फिल्ड बाहुबली प्लास्टिक, महालक्ष्मी शेती विकास, वरद इंडस्ट्रीज, चितळे डेअरी, कागल बंब, त्रिवेणी मसाले, पेरु नर्सरी स्टॉल, एस.एम. फर्निचर, बळीराजा आटा चक्की, संकेत बायोटेक, रोनिक, जैन इरिगेशन सागर ऑटोमोबाईल आदी नामवंत कंपन्या आपले उत्पादन सोबत या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.याचबरोबर विविध बी-बियाणे शेतीची अवजारे, खते औषधे आदी उत्पादने पहावयास मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळणार आहेत.प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, जनावरे स्पर्धा,खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी मिळणार आहे.या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे व पशूपक्षी यामध्ये उस्मानाबादी शेळ्या, बोकड, खडकनाथ कोंबड्या, ससे, पांढरे उंदीर, तसेच कुक्कुटपालन, वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबड्या, वेगवेगळे बैल, घोडे, म्हैशी, विविध पक्षी, विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत.या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

तपोवन मैदानावर दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ चार दिवस सतेज कृषी प्रदर्शन सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली...

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

Recent Comments