Wednesday, January 15, 2025
Home ताज्या "व्हायब्रंट महाएक्सपो" प्रदर्शनात २२ लाखाच्या ऑप्टिमा मॉडेल मशीनची व ७ लाख रुपयाच्या...

“व्हायब्रंट महाएक्सपो” प्रदर्शनात २२ लाखाच्या ऑप्टिमा मॉडेल मशीनची व ७ लाख रुपयाच्या सीनरजीक डबल पल्स मीग मशीनची विक्री

भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे “व्हायब्रंट महाएक्सपो” प्रदर्शन पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी गर्दी,नवनवीन मशिनरी व यंत्रांचा समावेश

“व्हायब्रंट महाएक्सपो” प्रदर्शनात २२ लाखाच्या ऑप्टिमा मॉडेल मशीनची व ७ लाख रुपयाच्या सीनरजीक डबल पल्स मीग मशीनची विक्री

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : व्हायब्रंट महाएक्सपो २०२२” हे भव्य औद्योगिक व मशिनरीचे प्रदर्शन पाहण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदानावर कोल्हापूर, सांगली,सातारा,व कोकण,बेळगावमधील उद्योजक भेट देऊन पाहणी करत आहेत.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन उपयुक्त असून नवनवीन मशिनरी याठिकाणी मांडण्यात आली आहेत.प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या लोकांनी हे प्रदर्शन चांगल्या पद्धतीचे आहे व वेगवेगळी यंत्र व मशीन बाहेरील कंपनीची पहावयास मिळत असल्याचे सांगितले.
आज या प्रदर्शनात आदित्य रोबोटिक्स अँटोमेशन प्रा.लि. कंपनीचे ऑप्टिमा मॉडेलचे फायबर लेझर कटिंग मशीन ज्याची किंमत ही २२ लाख रुपये आहे त्याची विक्री झाली असून हे मशीन कोल्हापूरच्या कुलकर्णी स्टील अँन्ड फर्निचर प्रा.लि. या कंपनीने खरेदी केलेले आहे.आदित्य रोबोटिक्स अँटोमेशन प्रा.लि.ही कंपनी ४० वर्षे जुनी कंपनी आहे.पुण्यात सर्वाधिक मशीन आहेत.६० पेक्षा जास्त मशीन गेल्या तीन वर्षात विकली गेली आहेत शीट मेटल म्हणजे माईल्ड स्टील आणि स्टेनलेस स्टील कटिंग करण्यासाठी हे मशीन वापरले जाते. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे टेक्निकल बाबींमध्ये वेगवेगळ्या आकारात साईज मध्ये हे मशीन बनवून दिली जातात असे कंपनीचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह कल्पेश लाहोटी यांनी सांगितले आहे.
व या प्रदर्शनात ७ लाख रुपये किंमत असलेले जासीक वेल्डिंग मशीन कंपनीचे श्रेया इंडस्ट्रीज या
ऑथोराईज्ड डिस्ट्रिब्युटर्स कडून सीनरजीक डबल पल्स मीग मशीनची विक्री ही झालेली आहे.हे मशीन जोतिर्लिंग फॅब्रिकेटेड कराड या कंपनीचे मिस्टर निरंजन यांनी विकत घेतले आहे.याचबरोबर अन्य मशिनरी व यंत्रेही बुक झालेली आहेत.                                                             कोरोनानंतर यावर्षी हे प्रदर्शन भरविण्यात आले असून याचा फायदा हा कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर,कोकण व कर्नाटक मधील उद्योजकांना होणार आहे.नवनवीन यंत्र व मशिनरी याठिकाणी आणण्यात आली असून उद्योजकांनी हे प्रदर्शन पहावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकलकरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.                                                                        टोयो ब्रँडची ऑल इलेक्ट्रिकल इंजेक्शन मोल्डिंग मशीन यामध्ये आपण प्लास्टिक उत्पादने घेऊ शकतो डेअरी उत्पादने यासाठी प्लास्टिकचा वापर करून वेगवेगळ्या वस्तू बनविल्या जातात. टुव्हीलर फोर व्हीलर गाड्यांचे पार्ट या मशीन मध्ये बनविले जातात.अल्विन रोबोट अँन्ड मशिनरी रोबोट मॅन्युफॅक्चरिंग करतात. रोबोट मॅन्युफॅक्चरिंग करणारी ही रोबोट बनवणारी कंपनी आहे.प्लॅस्टिकचे रॉ मटेरियल वापरून अनेक उत्पादने घेतली जातात असे अल्विन रोबोट अँन्ड मशिनरीचे संजय मेहरे यांनी सांगितले आहे.                      श्री महालक्ष्मी ट्रेंड लिंक्स (एसएमटीएल ग्रुप) चे डायरेक्टर अभिजित भोसले यांनी बोलताना व्हायब्रंट महाएक्स्पो हे माहितीचे प्रदर्शन उद्योग क्षेत्राला चालना देणारे प्रदर्शन असून आम्ही पंधरा वर्षे उद्योग क्षेत्रात इंडस्ट्रीला लागणारे ऑटोमेशनचे प्रोडक्ट विक्री करतो. बॉंमर स्वित्झर्लंड,पिल्झ, ओमरॉन,कुब्लेर याठिकाणी चॅनल पार्टनर आहोत. सी एन एस इलेक्ट्रिकचे बस ट्रकिंग या ब्रॅंडचे प्रॉडक्टचा पुरवठा केला जातो. या कंपनीचे भारतभर प्रॉडक्ट सप्लाय केले जातात तसेच आम्ही एस एम टी एल सेन्सर या नावाने गेल्या दोन वर्षांपासून प्रॉक्सी,फोटो सेन्सर,टेम्प्रेचर सेन्सर आणि सेफ्टी लाईट कर्टन्स यांचे उत्पादन करतो आहोत.                 कोल्हापूर मधील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व बाहेरील वेगवेगळ्या कंपन्यांची व त्यांच्या उद्योगांची माहिती कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य  यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील शाहूपुरी जिमखाना मैदान येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले असून आजच्या प्रदर्शनच्या दुसऱ्या दिवशी समावेश असणाऱ्या कंपन्यांची मशिनरी व माहिती घेण्यासाठी उदयोग क्षेत्रातील उद्योजकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.प्रदर्शन पाहण्यासाठी मोफत असून अजून दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कोल्हापूरमध्ये प्रथमच जर्मन हँगर मध्ये संपूर्ण वातानुकूलित हे प्रदर्शन होत आहे.स्टार्टपसाठी नवीन उद्योजकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती आज दुसऱ्या दिवशी सेमिनारच्या माध्यमातून देण्यात आली.
या प्रदर्शनाचा उपयोगकोल्हापूर,सांगली,सातारा,बेळगाव,कोकणसह राज्यातील विविध ठिकाणीच्या उद्योजकांना होणार आहे.याचबरोबर इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.देश विदेशातील नामांकित कार्पोरेट कंपन्यांचे स्टॉल्स व त्यांच्या मोठ मोठ्या मशिनरी व उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्वच उत्पादनांचे एकूण १०० च्या पासपास कंपन्यां व त्यांची उत्पादने याठिकाणी मांडण्यात आली आहेत.
या प्रदर्शनासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर एमआयडीसी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशन,कोल्हापूर
इंजीनियरिंग असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकलंगले, डेस्टिनेशन कोल्हापूर यांचे सहकार्य मिळाले आहे.तर प्रदर्शनाचे गोल्ड स्पॉन्सर हे रिलायन्स पॉलिमर्स व रिमसा क्रेन्स प्रा.लि. हे आहेत.
या प्रदर्शनात  वेगवेगळ्या कंपन्यांची पॅकेजिंग प्रॉडक्ट मशिनरी, कटिंग टूल मॅन्युफॅक्चरर, सेंटरलाइस कुलिंग सिस्टिम, सीएनसी लेथ मशीन मॅन्युफॅक्चरर,फाउंड्री केमिकल मॅन्युफॅक्चरर ,व्हॅपिंग मशीन, इंडस्ट्रियल पाईप, सोलर, मल्चिंग फिल्मस, इंडस्ट्रियल बॉक्सेस, एअर कॉम्प्रेसर,केमिकल इंजीनियरिंग एनालिसिस,  इलेक्ट्रॉनिक अँड इकॉनोमिकल स्केल इलेक्ट्रॉनिक वेट मशीन, आदींसह अन्य उत्पादने पहावयास मिळत आहेत.
उद्योग क्षेत्राशी निगडित असलेल्या या प्रदर्शनामध्ये राज्यातील कोल्हापूरसह देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा व त्यांच्या उत्पादनांचा समावेश आहे.यामध्ये गोदरेज अँड बॉईसी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि, ओसवाल ब्रदर्स, सेफसील्स मशीन प्रायव्हेट लिमिटेड ,इकविनोकस एन्व्हायरमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,इंगर सील लिमिटेड,ब्रिस्क इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, न्यूमीनल पॉवर, अंजनी ट्यूबज इंडिया, खतेद्र मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, रामासा क्रेन्स प्रायव्हेट लिमिटेड,यंत्रा न्यूमॅटिक अँड इक्विपमेंट,एमएनके बिल्डिंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, पॅकनेक इंडस्ट्रीज ,फॅब इंडिया इंजिनियर्स, एएस अँग्री एक्वा एलएलपी, अलटेक अँलॉइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ऍक्युशार्प  कटिंग टूल्स प्रायव्हेट लिमिटेड, सुपर मीटिंग एशियन एस ई कुपरं मॅटिंग,एशियन मशीन टूल प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यां व त्यांची मशिनरी पहावयास मिळत आहेत.मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर या धर्तीवरील हे प्रदर्शन असून या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे क्रिएटिव्हज एक्झिबिशन अँन्ड इव्हेट व हाऊस ऑफ इव्हेंट या संस्थेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments