कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १९,३०७ मतांनी विजयी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा आज मतमोजणीची प्रकिया सकाळी शासकीय गोदाम राजाराम तलाव सरनोबत वाडी येथे पार पडली. संत तुळशीने ्यंत चुरशीने झालेल्या या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतमोजणी तून सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या जयश्री जाधव या आघाडीवर होत्या त्या आघाडीवरच राहिल्या अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानाच्या प्रचाराचा आज शेवट मतमोजणी द्वारे झाला आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि गाजलेल्या या निवडणुकीचा निकाल आज लागला यामध्ये काँग्रेसचे जयश्री जाधव लिहा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यात या विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती मात्र या निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना कट करत आपला उमेदवार हा 19 हजार च्या मतांनी विजयी केला आहे जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ व एकूणच शहरांमध्ये व जिल्ह्यांमध्ये आनंदाचा उत्साहाचा जल्लोष साजरा करण्यात आला मात्र दुसरीकडे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अचानक जाण्याचा की या उत्साहावर सावध होते या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांना ७७ हजार २२६ मते मिळाली.
पहिल्या फेरीत – जयश्री जाधव यांना ४८५६ मते,दुसऱ्या फेरीत – ५५१५ मते, तिसऱ्या फेरीत – ४९२८ मते,चौथ्या फेरीत – ३७१९ मते,पाचव्या फेरीत – ३६७३ मते,सहाव्या फेरीत – ४६८९ मते सातव्या फेरीत – ३६३२ मते,आठव्या फेरीत २९८१ मते मिळाली आहेत या आठ फेरीअखेर श्रीमती जयश्री जाधव यांना ३३९९३ मते मिळाली आहेत. नवव्या फेरीत जयश्री जाधव २७४४ मते,दहाव्या फेरीत – २८१८ मते,अकरावी फेरीत – २८७० मते,बारावी फेरीत – ३९४६ मते मिळाली तर तेराव्या फेरीत – ५१६ मते मिळाली.चौदाव्या फेरीत – ३७५६ मते,पंधराव्या फेरीत – ३७८८ मते मिळाली.सोळाव्या फेरीत – ३६३८ मते,सतराव्या फेरीत – २७९५ मते,अठराव्या फेरीत – ३९४८ मते,एकोणिसाव्या फेरीत – ३१६९ मते,विसाव्या फेरीत – ४३६६ मते मिळाली एकविसाव्या फेरीत – ३४५२ मते तर बाविसाव्या फेरीत – ३६२९ मते व तेविसाव्या फेरीत – ३३३७ मते,चोविसाव्या फेरीत – ३३३७ मते व पंचविसाव्या फेरीत – २७५५ मते मिळाली व सविसाव्या फेरीत – १४६९
भाजपचे सत्यजित नाना कदम यांना पहिल्या फेरीत – २७१९ मते, मते,दुसऱ्या फेरीत – २५१३ मते, तिसऱ्या फेरीत – २५६३ मते,चौथ्या फेरीत – २९३७ मते,पाचव्या फेरीत – ४१९८ मते,सहाव्या फेरीत – २९७२ मते सातव्या फेरीत – २४३१ मते,आठव्या फेरीत ३५०५ मते मिळाली आहेत या आठ फेरीअखेर सत्यजित नाना कदम यांना एकूण मते २४८४१ मिळाली आहेत.
नववी फेरीत – २८९७ मते,दहाव्या फेरीत – ३७९४ मते,अकराव्या फेरीत – २७५६ मते तर बाराव्या फेरीत – २९०८ मते पडली.तेराव्या फेरीत – ४९ मते मिळाली.चौदावी फेरीत २६६९ मते,पंधराव्या फेरीत – २०५६ मते सोळावी फेरीत – ३८४७ मते मिळाली. सतरावी फेरीत – ३४८८ मते,आठरावी फेरीत – ३१८९ मते,एकोणिसाव्या फेरीत – २९७४ मते,विसाव्या फेरीत – ३०७४ मते ,एकविसाव्या फेरीत – ३६६२ मते,बाविसाव्या फेरीत – ३२२६ मते,तेविसाव्या फेरीत – २५३१ मते,चोविसाव्या फेरीत – २८३० मते, पंचविसाव्या फेरीत – २९४४ मते सविसाव्या फेरीत – १३०३ मते मिळाली आहेत.
एकूण २६ फेरीत ही मतमोजणीची प्रक्रिया ही पार पडली.
विजयानंतर बोलताना जयश्री जाधव यांनी उत्तर विधानसभा निवडणुकीतील माझा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. आण्णांच्या माघारी कोल्हापूरच्या जनतेने माझी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. यापुढील काळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी आहे आणि विकासासाठी मी कटीबद्ध आहे. आण्णांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक आराखडे तयार केले आहेत. त्यांचे नियोजनबध्दरित्या पूर्तता करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.
प्रचारात कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्दे घेऊन मी जनतेच्या समोर गेलो. यावेळी अबालवृद्ध नागरिक, महिला, युवावर्गाकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळाला. याची प्रचिती मतदानातून मिळाली आहे. कोल्हापूरकरांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. अशी प्रतिक्रिया श्रीमती जयश्री जाधव यांनी दिली आहे.