कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत जयश्री जाधव आठव्या फेरीअखेर ९१५२ मतांनी आघाडीवर
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा आज मतमोजणीची प्रकिया ही सुरू झाली असून आठव्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९१५२ मतांनी आघाडीवर आहेत. बारा एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा कार्यक्रम पार पडला या निवडणुकीसाठी आज १६ एप्रिल रोजी रोजी मतमोजणी ही होत आहे.काँग्रेस कडून श्रीमती जयश्री जाधव व भाजपकडून सत्यजित नाना कदम हे दोघे निवणुकीच्या रिंगणात आहेत.मतमोजणीची प्रक्रिया ही शासकीय गोदाम राजाराम तलाव सरनोबतवाडी येथे होत आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी केली गेली आहे. आठव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २९८१ व भाजपचे सत्यजित नाना कदम यांना ३५०५ मते पडली आहेत या फेरीत सत्यजित नाना कदम ५२४ मतांनी आघाडीवर आहेत .ही आघाडी जरी असली तरी काँग्रेसच्या जयश्री जाधव या एकूण आठव्या फेरीअखेर ९१५२ मतांनी आघाडीवर आहेत.
यामध्येपहिल्या फेरीत – जयश्री जाधव यांना ४८५६ मते,दुसऱ्या फेरीत – ५५१५ मते, तिसऱ्या फेरीत – ४९२८ मते,चौथ्या फेरीत – ३७१९ मते,पाचव्या फेरीत – ३६७३ मते,सहाव्या फेरीत – ४६८९ मते सातव्या फेरीत – ३६३२ मते,आठव्या फेरीत २९८१ मते मिळाली आहेत या आठ फेरीअखेर श्रीमती जयश्री जाधव यांना ३३९९३ मते मिळाली आहेत.
व भाजपचे सत्यजित नाना कदम यांना पहिल्या फेरीत – २७१९ मते, मते,दुसऱ्या फेरीत – २५१३ मते, तिसऱ्या फेरीत – २५६३ मते,चौथ्या फेरीत – २९३७ मते,पाचव्या फेरीत – ४१९८ मते,सहाव्या फेरीत – २९७२ मते सातव्या फेरीत – २४३१ मते,आठव्या फेरीत ३५०५ मते मिळाली आहेत या आठ फेरीअखेर सत्यजित नाना कदम यांना एकूण मते २४८४१ मिळाली आहेत.