स्पीडफोर्स-ड्रीम सर्व्हिसेस शोरूम निगडेवाडी इथं सुरू
कोल्हापूर/प्रतिनिधी : स्पीडफोर्स मल्टी-ब्रँड टू व्हीलर सर्व्हिस साखळीतील नवी शाखा कोल्हापुरात सुरू झाली आहे. करवीर तालुक्यातील निगडेवाडी इथं स्पीडफोर्स-ड्रिम सर्व्हिसेस या नावानं ही शाखा सुरू झाली असून, यामध्ये नवीन दुचाकींची विक्री, विक्रीपश्चात सेवा तसेच जुन्या गाडयांची दुरूस्ती, रंगकाम यासह सर्व सेवा एकाच छताखाली मिळण्यास प्रारंभ झाल्यानं या नवीन शोरूममुळे दुचाकी वाहनधारकांना दिलासा मिळालाय.
स्पीडफोर्स इंडिया कंपनीच्या वतीनं झपाट्याने वाढणार्या मल्टी-ब्रँड टू व्हीलर सर्व्हिस फ्रँचायझी चेन कंपनीची २३४ वं दुचाकी सेवा केंद्र – ड्रीम सर्व्हिसेस या नावाने कोल्हापूर-गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडी इथं गेल्या आठवडयात सुरू झाली आहे. सर्व ब्रँडच्या दुचाकींच्या सर्व्हिसिंगसाठी स्पीडफोर्स ही देशातील एकमेव प्रथम क्रमांकाची आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. निगडेवाडी इथल्या नवीन शाखेचे उद्घाटन अनंत बापट, सागर धोबी यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. या स्पीडफोर्स केंद्रात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक दुचाकींची विक्री, विक्री पश्चात सेवा ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार आहेत. बजाज, हिरो, टि.व्ही, होंडा, यामाह यासह सर्व अत्याधुनिक दुचाकींची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचबरोबर ब्रेक सर्व्हिस, ब्रेक डाउन, बाईक सर्व्हिस, प्रीमियम बाईक सर्व्हिस, ऑइलिंग, बॅटरी, ऍक्सिडेंटल सपोर्ट, क्लेम सेटलमेंट, रोड साईड असिस्टन्स, ईव्ही चार्जिंग आणि ईव्ही सर्व्हिसिंग आणि एएमसी यांचीही काम करून दिली जातात. तसंच या केंद्रात ग्राहकांना प्रत्येक ब्रँडच्या दुचाकींचे सुटे भागही किफायतशिर किंमतीत मिळू शकतात, अशी माहिती सागर धोबी यांनी दिली. या ठिकाणी दुचाकींचा विमाही काढता येतो. शोरूममध्ये प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे. स्पीडफोर्स कंपनीची स्थापना सन २०११ मध्ये दीपेन बाराई, कपिलभिंडी आणि अशोक एम. शहा यांनी केलीय. या तिघांनाही ऑटोमोबाईल उद्योग आणि विविध क्षेत्रांचा प्रचंड अनुभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया या धोरणापासून प्रेरणा घेत, कंपनीचं काम सुरू असून, यातून अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत, अशी माहिती भाविशा बुध्द देव यांनी दिली.