आज होणार उत्तर विधानसभा निवडणुकीचा फैसला
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुक ही बारा एप्रिल रोजी झाली होती. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीच्या प्रचारामुळे कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहोचले आणि उमेदवारांची नावेही माहित झाली. कोणत्याही निवडणुकीत आत्तापर्यंत इतका प्रचार कोणत्याही पक्षाकडून केला गेला नाही इतका प्रचार कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या साठी केला गेला आणि ही निवडणूक पोट निवडणूक होती या पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडी मधील नेतेमंडळी आणि भाजपकडून नेतेमंडळी कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होते आरोप-प्रत्यारोप जोरदार टीका टिप्पणी यामुळे निवडणुकीचा प्रचार चांगलाच गाजला. भाजपकडून या निवडणुकीसाठी सत्यजित नाना कदम निवडणुकीच्या रिंगणात होते. आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव या रिंगणात होत्या त्यांच्या बरोबर अन्यही उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. मात्र खरा प्रचार हा भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार यांच्या मध्येच रंगला दोन्ही साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती आणि या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार हा दोन्हीकडील नेतेमंडळींनी केला त्यामुळे ही निवडणूक सर्वस्तरावर चांगलीच गाजली.या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या तर त्या कोल्हापूरच्या पहिला महिला आमदार होणार आहेत. आणि भाजपकडून जर सत्यजित नाना कदम यांचा विजय झाला तर मात्र कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही निवडणूक महत्त्वाची तर आहेच शिवाय येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी ही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे.त्यामुळेच ही निवडणूक लागली आणि निवडणूक पार पडली आता मात्र निवडणुकीचा निकाल उद्या १६ एप्रिल रोजी लागणार असल्याने या निकालाकडे संपूर्ण देशाचे व राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण या निकालानंतरच खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.अशा चर्चा आहेत. त्यामुळे अनेकांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागल्या आहेत त्यामुळे खरी प्रतिष्ठा कोणाच्या पदरात पडणार आहे हे मात्र उद्याच निकालानंतर कळणार आहे. शिवाय उद्या कोल्हापूर येथील वाडी रत्नागिरी ज्योतिबाची चैत्र यात्राही आहे या यात्रे दिवशीच मतमोजणी होत असल्याने कुणाच्या नावावर हा गुलाल लागणार याबाबतही चर्चा होत आहेत आणि उत्सुकता मात्र कोल्हापूरमध्ये शिगेला पोहोचलेली आहे उमेदवारांची ही धडधड वाढली आहे एकूण ६१ टक्के इतके मतदान झालेले आहे. त्यामुळे कोणाचे पारडे अधिक चांगले आहे कोणाचे पारडे जड आहे हे उद्याच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये विजयी उमेदवारांचा जल्लोष केला जाणार आहे आणि नेतेमंडळीनाही तितकेच महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे त्यामुळे उद्याचा निकाल हा कोल्हापूरच्या दृष्टीने व संपूर्ण राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असा असणार आहे.