Wednesday, December 4, 2024

 

हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून शिवाजी चौक येथे दहन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशात “बेटी पढाओ, बेटी बचाओ” चा नारा दिला जात असताना भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात “बेटी भगाओ, बेटी जलाओ” सारखी अमानवी कृत्ये घडत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात महिलांवरील अत्याच्यारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचे काम उत्तरप्रदेश सरकार कडून होत आहे. त्यामुळे बलात्कारातील आरोपीना पाठीशी घालणारी बीजेपी म्हणजेच “बेटी जलाओ पार्टी”चे उत्तरप्रदेशातील सरकार बरखास्त करावे, आरोपींना फाशी व्हावी आणि पिडीत दलित युवतीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख श्री.रविकिरण इंगवले यांनी केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी “बलात्काऱ्याना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो”, “बरखास्त करा, बरखास्त करा.. उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करा”, “राजीनामा द्या, राजीनामा द्या.. योगी आदित्यनाथ राजीनामा द्या”, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. यानंतर हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेच्या वतीने दहन करण्यात आले.यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख श्री.रविकिरण इंगवले यांनी, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या एका विकृत अभिनेत्रीला सुरक्षा देणारे भाजप सरकार बलात्कार झालेल्या पिडीतेच्या मृतदेहावर पोलीसांकरवी अत्यसंस्कार करते, यासारखे दुर्दैव नाही.
गेली दहा वर्षे केंद्रात सत्ता भोगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आला आहे. उत्तरप्रदेश मधील भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर, भाजप नेता स्वामी चिन्मयानंद, जम्मू कुठूआ बलात्कार प्रकरण, मेघालयचे माजी राज्यपाल भाजप नेते वी षण्मुगनाथन यांनी राज्यपालपदी असतांना राज्यपाल भवनला लेडीज क्लब बनवलं होत. मध्यप्रदेशचे RSS आणि भाजप नेता प्रदीप जोशी याचा एका मुलाचे लैंगिक शोषण करतांनाचा व्हिडिओ, भोपाळ भाजप नेता भोजपाल सिंग आणि त्याचे दोन सहकारी. एका दलित महिलेला बीपीएलचे रेशनकार्ड देऊ सांगून बलात्कार केला.
दिल्ली भाजप नेता विजय जॉली महिलेला ड्रग्ज देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना, गुजरात भाजप नेता जयेश पटेल याने नर्सिंगची विद्यार्थिनी असलेल्या 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. भाजप आमदार राम कदमांनी पोरी पळवून नेण्याचे दिलेले सल्ले, अशा अनेक घटनांमध्ये भाजपचा आणि बलात्काराच्या आरोपींचा जवळचा संबंध आलेला आहे. पण वेळोवेळी भाजपने या घटना आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत दाबून टाकलेल्या आहेत. भाजपवाले नेहमीच बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने का असतात? असा सवाल उपस्थित होत आहे. आताही हाथरस येथील बलात्काऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न भाजपवाले करताय. मुलीच्या कुटुंबियांवर सरकारने टाकलेला दबाव हा केवळ यात आरोपी असलेले तरुण हा भाजपची आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वोट बँक असलेल्या समाजाचा असल्याने या तरुणांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. या प्रकरणाची सखोल चौकशी होवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, पिडीतेच्या कुटुंबियाना न्याय मिळावा, पिडीतेच्या कुटुंबीयांवर दबाव आणणाऱ्या तेथील जिल्हाधिकाऱ्यावरही कारवाई व्हावी. या संपूर्ण घटनेची जबाबदारी घेवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, केंद्र सरकारने उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करावे, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी, पिडीतेला न्याय देण्याऐवजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे अघोरी कृत्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने केले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री खरोखरच साधू आहेत की साधुपणाचा ढोंग करणारे अंधभक्त? असा सवाल उपस्थित होत असल्याचे सांगत उत्तरप्रदेशवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख रवीभाऊ चौगुले, माजी विभागप्रमुख दीपक गौड यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी शिवसेना कोल्हापूर शहर महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, माजी शहरप्रमुख श्रीमती पूजाताई भोर, मंगलताई कुलकर्णी, रुपाली कवाळे, पूजा कामते, शाहीन काझी, सुनिता भोपळे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, फेरीवाले सेना शहरप्रमुख धनाजी दळवी, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, अमित चव्हाण, सुनील खोत, अजित गायकवाड, दीपक चव्हाण, राहुल चव्हाण, विभागप्रमुख विक्रम पवार, राजू काझी, कपिल सरनाईक, उदय भोसले, भाई जाधव, माथाडी कामगार सेनेचे शहरप्रमुख राज जाधव, युवा सेना शहर प्रमुख चेतन शिंदे, योगेश चौगले, शैलेश साळोखे, दादू शिंदे, अक्षय कुंभार, सचिन भोळे, निलेश हंकारे, राजू ढाले, सागर घोरपडे, श्रीकांत मंडलिक, गोविंद वैदू, अशोक माने, गणेश वाळवेकर, अंकुश निपाणीकर, अर्जुन आंबी, सुभाष पाटील, कृपालसिंह पुरोहित, संतोष रेवणकर, कपिल केसरकर, अनिकेत राऊत, सचिन पाटील, टिंकू देशपांडे, सचिन क्षीरसागर, विनोद हजारे, रुपेश इंगवले, किरण पाटील, विशाल पाटील, शैलेंद्र गवळी, राकेश माने यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments