Wednesday, October 23, 2024
Home ताज्या शुक्रवारपर्यंत शहरातील पॅचवर्क करणेच्या रस्त्यांची यादी सादर करा - महापौर सौ.निलोफर आजरेकर

शुक्रवारपर्यंत शहरातील पॅचवर्क करणेच्या रस्त्यांची यादी सादर करा – महापौर सौ.निलोफर आजरेकर

शुक्रवारपर्यंत शहरातील पॅचवर्क करणेच्या रस्त्यांची यादी सादर करा – महापौर सौ.निलोफर आजरेकर

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी दिलेल्या सुचनेनुसार शुक्रवारपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांच्या पॅचवर्कची यादी तयार करण्याच्या सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी दिल्या. शहरातील रस्ते दिवाळीपुर्वी पॅचवर्कची कामे पुर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी, शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती. महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी दिवाळीपुर्वी लवकरात लवकर पॅचवर्कची कामे पुर्ण करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुख्य रस्ते, प्रभागातील वर्दळीचे व 9 मिटरच्या वरील रस्ते पॅचवर्क करण्याची यादी तयार करणेच्या सुचना दिल्या. त्याचबरोबर विविध निधीतून 50 कोटीचे रस्ते मंजूर झाले असून या मंजूर केलेल्या रस्तेंच्या ठेकेदारांकडून त्या रस्त्यांची डागडुजी करुन घ्यावी. यासाठी सर्व ठेकेदारांची बैठक आयोजित करावी. ते मंजूर रस्ते सोडून इतर रस्ते पॅचवर्क करण्यासाठी तातडीने निविदा काढण्याच्या सुचना दिल्या.गटनेते शारगंधर देशमुख यांनी दिवाळीपुर्वी 10 तारखेपर्यंत पॅचवर्कची कामे पुर्ण झाली पाहिजेत. यासाठी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची यादी तयार करुन किती रक्कम पॅचवर्कसाठी लागणार याचे एस्टीमेट तयार करा. ज्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे लिकेज आहेत. ते लिकेज काढून घेऊन तेथीलही पॅचवर्क करुन घ्या अशा सुचना दिल्या.शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी मंजूर 50 कोटी रस्ते सोडून इतर रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी सर्व उपशहर अभियंता पॅचवर्कच्या ठिकाणांची मापे घेऊन एस्टीमेट शुक्रवारपर्यंत सादर करतील. जनरल पॅचवर्कची निविदा मंजूर असून मुदतीमध्ये कामे पुर्ण होण्यासाठी विभागीय कार्यालयावाईज पेव्हर पध्दतीचे पॅचवर्क करण्यासाठी तातडीने निविदा काढू. मंजूर रस्तेवरील पॅचवर्कची कामे संबंधीत ठेकेदाराकडून करुन घेऊ. तसेच मुदतीत असलेले रस्तेही संबंधीत ठेकेदाराकडून दुरुस्त करुन घेऊ असे सांगितले.यावेळी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, सहा.आयुक्त संदीप घार्गे, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आश्पाक आजरेकर, महेश उत्तुरे आदी उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments