Wednesday, October 23, 2024
Home ताज्या डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. ६) डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ दिनांक १७ जून रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.डॉ शिर्के (जन्म ११ जून १९६५) साली झाला.यांनी शिवाजी विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ अश्विनी कुमार नांगिया आणि राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर हे समितीचे अन्य सदस्य होते.समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments