Wednesday, October 23, 2024
Home देश राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत मेलेल्या माणसाच्या टाळू वरच लोणी खाण्याचा रुजू होऊ...

राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत मेलेल्या माणसाच्या टाळू वरच लोणी खाण्याचा रुजू होऊ पाहणारा प्रकार खपवून घेणार नाही : श्री.राजेश क्षीरसागर यांचा इशारा

राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत मेलेल्या माणसाच्या टाळू वरच लोणी खाण्याचा रुजू होऊ पाहणारा प्रकार खपवून घेणार नाही : श्री.राजेश क्षीरसागर यांचा इशारा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या मास्क, ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या किमतीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री केली जात आहे. ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरची जादा दराने विक्री करून जनतेची लुट केली जात आहे. रेमडेसिवर इंजेक्शन मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड होत असताना त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने लोकांची राजरोस लुट चालू आहे. करवीर नगरी ही राजर्षी शाहू महाराजांची पवित्र नगरी आहे आणि या नगरीत कोणी मेलेल्या माणसाच्या टाळू वरच लोणी खाण्याचा प्रकार करीत असेल तर शिवसेना तो खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिला. यासह हॉस्पिटलच्या बिलासंदर्भात कोणतीही तक्रार असेल तर शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एन ९५ मास्क, ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या बेलगाम किमती, रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णालयांचे फायर ऑडीट, खाजगी रुग्णालयात होणारी आर्थिक पिळवणूक आदींबाबत को.म.न.पा. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना बैठकीत सूचना दिल्या. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीसच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
एन ९५ मास्क, ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या बेलगाम किमतीवर कोणाचे नियंत्रण आहे? ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री केली जात आहे. ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरची जादा दराने विक्री करून जनतेची लुट केली जात आहे. एन-९५ मास्क २०० ते २५० रुपयांपर्यंत विकले जात असल्याने सामान्य जनतेचा स्वस्त व असुरक्षित मास्क वापरण्याकडे कल वाढत आहे, त्याचमुळे या रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या गुणवत्ता आणि दरावरही प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्याचमुळे सर्वसामान्य जनतेची राजरोस लुट होत आहे. रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी फरकट होत आहे. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. दर कमी करूनही काही ठिकाणी जुन्या किमतीत इंजेक्शनची विक्री केली जात आहे. एकीकडे इंजेक्शनची किमत २२०० रुपये असताना दुसरीकडे ते ५८०० रुपयांना विकले जाते. ही दरात तफावत का? की इंजेक्शनच्या गुणवत्तेत फरक आहे का? औषध उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी औषधे संपली असल्याचे सांगितले जाते. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी यांचे यावर नियत्रण नाही. यापूर्वी इंजेक्शन मोफत दिली जात होती तर आता ती विकत का घ्यावी लागतात? इंजेक्शनच्या किमतीत फरक असल्याने जास्त नफ्यासाठी जादा किमतीची इंजेक्शनचा साठा करून ती विकली जात आहेत का? आधीच इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच त्यांच्या परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेवू नये असे क्षीरसागर म्हणाले.
यावर बोलताना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, मा.मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने माझी कुटुंब माझी जबाबदारी ही योजना लोकचळवळ रूपातून उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कोरोना मुक्तीसाठी या चळवळीच्या माध्यमातून तातडीने उपचार पद्धती अवलंबून रेमडेसिवर इंजेक्शन लागूच नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यासह रेमडेसिवर इंजेक्शन सध्या सरकारी कोव्हीड सेंटर मध्ये काम करत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत दिली जात असल्याची माहिती दिली.तर औषध नियंत्रक मनोज आहिया यांनी, इंजेक्शनच्या कंपनी वेगवेगळ्या असल्याने दरात तफावत असल्याचे सांगत, केंद्र किंवा राज्य शासनाकडून कायदा अंमलात आणल्यास दरावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही किंमतीच्या इंजेक्शनच्या गुणवत्तेत कोणताही फरक नसल्याचे स्पष्ट केले.
यावर बोलतना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गुणवत्तेत फरक नसेल तर स्वस्त इंजेक्शनच का विकली जात नाहीत, असा सवाल करीत लोकांना मदत करण्याच्या भावनेने सर्वांनी काम करणे गरजेचे असून, अधिकाराचा योग्य वापर करून तातडीने विक्रेत्यांची बैठक घ्या, औषध निर्माण कंपन्याना सूचना द्या पण दोन दिवसात कोल्हापुरात स्वस्त इंजेक्शन नागरिकांना उपलब्ध करून द्या, अशा सूचना केल्या. त्याचबरोबर काल पहाटे सीपीआर मध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या धर्तीवर महानगरपालिका अग्निशामक दलाने शहरातील सर्वच रुग्णालयांचे पुन्हा फायर ऑडीट करावे. फायर ऑडीटमध्ये त्रुटी असल्यास तात्काळ त्या त्रुटी रूग्णालयामार्फत दुरुस्त करून घ्याव्यात, अशी सूचना केली.त्याचबरोबर शहरातील अनेक खाजगी दवाखाने राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. परंतु, कोरोना संकट काळात काही रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात कुचराई होत आहे. शासनाच्या महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. परंतु या पॅकेजचा लाभ प्रत्यक्षात किती रुग्णांना मिळाला? यावर महानगरपालिका आरोग्य विभागाचे नियंत्रण नाही. वारंवार सूचना देवूनही रुग्णांच्या नातेवाईकांची बिलातून आर्थिक लुट होण्याच्या तक्रारी येत आहेत. भीतीपोटी नागरिक तक्रार करत नाहीत, प्रशासनाने खाजगी हॉस्पिटलवर समन्वयक, ऑडीटर नेमले असतानाही आर्थिक लुट सुरूच असल्याचे सांगितले. त्याचपद्धतीने नॉन कोव्हीड पेशंटच्या उपचारांवर ही तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगुले यांनी, रुग्णाच्या नातेवाईकांना १५ – १५ लाखांची बिले दिली जातात, एवढी बिले होतात कशी? त्यांना कोणती औषधे दिली जातात? इंजेक्शन पण बाहेरून विकत घ्यावे लागते तर मग एवढे पैसे घेवून नागरिकांची लुट केली जात आहे, डॉक्टरांच्या पीपीई कीटचे पण पैसे बिलात लावले जातात. तेच कीट घालून डॉक्टर सर्व रुग्णांना एकत्रित तपासतात. तर मग सगळ्याच रुग्णांच्या बिलात पीपीई कीटचे पैसे का घातले जातात, असा प्रश्न उपस्थित केला.
यावर आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, महापालिकेने ऑडीटर नेमले असून, दिवसाकाठी रेग्युलर बेडसाठी रु. चार हजार, आय.सी.यु.साठी रु.साडेसात हजार आणि व्हेंटीलेटर बेड साठी रु.नऊ हजार हे दर शासनाने ठरवले असून, यापेक्षा अधिक दराने कोणी पैसे आकारात असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर नागरिकांना बिलात शंका असल्यास त्यांनी ऑडीटर कडून बिलाची तपासणी करून घेतल्याशिवाय बील भरू नये, त्यांचे शंका निरसन झाल्यानंतर बिलाची रक्कम जमा करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस शिष्ठमंडळामध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शिवसेना गटनेते राहुल चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगुले, दीपक गौड, उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, सुजय संकपाळ, महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंदळे. औषध नियंत्रक मनोज आहिया, अन्न व औषध प्रशासनाच्या प्रभारी निरीक्षक सपना घुणेकर, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक सुभाष नांगरे, वैध मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक पवार आदी उपस्थित होते.

बैठकीतील ठळक मुद्दे

रेमडेसिवर इंजेक्शन, एन ९५ मास्क,ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी,
रेमडेसिवर इंजेक्शनचा अतिरिक्त साठा मागवून रुग्णांना स्वस्तात उपलब्ध करून द्या किंवा महापालिकेतर्फे मोफत उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना,रुग्णालयाच्या बिलासंदर्भात शंका असल्यास शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन,महापालिका क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करण्याची सूचना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments