Thursday, December 5, 2024
Home ताज्या १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार 'हॅशटॅग प्रेम'

१७ डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘हॅशटॅग प्रेम’

१७ डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘हॅशटॅग प्रेम’

प्रेमाचा मूळ रंग गुलाबी असला तरी त्याच्या अनेक छटा आजवर प्रत्येकानं आपापल्या परीनं अनुभवल्या आहेत. काळानुरूप प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या तरी मूळ प्रेमभावना आजही तिच आहे. आजचा आधुनिक काळही यात बदल घडवू शकलेला नाही. तरुणाईला जी भाषा समजते आणि जी लँग्वेज इझी वाटते त्या भाषेत आज प्रेम व्यक्त केलं जात आहे. याच कारणामुळं प्रेमकथांवर आधारित चित्रपटांची टायटल्सही त्याच रंगात रंगल्याची पहायला मिळतात. ‘हॅशटॅग प्रेम’ हा आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट याचीच अनुभूती देणारा आहे. कोरोना आणि लॅाकडाऊनमुळं लांबणीवर गेलेला ‘हॅशटॅग प्रेम’ १७ डिसेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे.
निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘हॅशटॅग प्रेम’ची निर्मिती केली असून, वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या सहयोगानं पिकल एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून हा चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. अरविंद गोविंद पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. खरं तर हा चित्रपट अगोदर १९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, पण लॅाकडाऊन लागलं आणि सगळीच गणितं बदलली. आता पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून आकाशाकडे झेपावत ‘हॅशटॅग प्रेम’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर अगोदरच प्रदर्शित झाला असून, ट्रेलरला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. राजेश बाळकृष्ण जाधव यांनी मोठ्या कुशलतेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री या चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र असून, रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी पुरेशी ठरणार आहे. ‘हॅशटॅग प्रेम’च्या ट्रेलरमध्ये मिताली-सुयश या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली आहे. आता चित्रपटात ही जोडी कशा प्रकारे धमाल करते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीही आतुरली आहे.
दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा ‘हॅशटॅग प्रेम’ची टीम नव्या जोमानं प्रदर्शनाच्या तयारीला  लागली आहे. प्रेम हा तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आवडता विषय आहे. प्रेमाला असंख्य पैलू आणि बाजू आहेत. त्यातील काही अप्रकाशित पैलू आणि त्यानिमित्तानं येणाऱ्या नातेसंबंधांवर ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या कथेत प्रेक्षकांसाठी एक अंडरकरंट मेसेजही दडला आहे. सुमधूर गीत-संगीताचा साज लेऊन सजलेलं या चित्रपटाचं आजच्या युगातील कथानक प्रेक्षकांना नक्कीच आपलंसं वाटेल यात शंका नसल्याचं मतही जधव यांनी व्यक्त केलं आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि प्रभावी कथानक हे या चित्रपटाचे सर्वात मोठे प्लस पॅाइंट असून, चित्रपट पाहताना प्रेक्षकांना याचा अनुभव येईल असं निर्माते अनिल गोविंद पाटील यांचं म्हणणं आहे. या सिनेमाची कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली आहे. डीओपी राजा फडतरे यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी रसिकांना भुरळ पाडणारी आहे. गीतकार संजाली रोडे आणि कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार प्रविण कुवर यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी गायक-संगीतकार रोहित राऊतनं सांभाळली आहे. कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केलं असून, महेश भारंबे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments