Sunday, January 19, 2025
Home ताज्या डार्लिंग'चं नवं गाणं 'मनाचं पाखरु ' रसिकांच्या भेटीला

डार्लिंग’चं नवं गाणं ‘मनाचं पाखरु ‘ रसिकांच्या भेटीला

डार्लिंग’चं नवं गाणं ‘मनाचं पाखरु ‘ रसिकांच्या भेटीला

कोल्हापूर/प्रतिनिधी : १० डिसेंबर २०२१ रोजी रिलीज होणाऱ्या ‘डार्लिंग’ या आगामी बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. हि उत्सुकता आणखी ताणणारं ‘डार्लिंग’मधील ‘मनाचं पाखरू…’ हे नवं कोरं लाँच करण्यात आलं आहे. 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांची निर्मिती असलेल्या ‘डार्लिंग’नं चित्रपटगृहांमध्येच प्रेक्षकांना भेटण्याचं आपलं वचन पाळलं आहे. या चित्रपटाचे रिलिजिंग पार्टनर आणि वितरक पिकल एंटरटेनमेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी आहेत. विविध कारणांमुळं सुरूवातीपासून लाइमलाईटमध्ये असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे.
‘डार्लिंग तू…’ या टायटल साँगनंतर ‘ये है प्यार…’ हे ‘डार्लिंग’मधील रोमँटिक साँगला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाल्यानंतर ‘मनाचं पाखरू…’ हे गाणंही रसिकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. मंदार चोळकरनं लिहिलेलं हे गाणं शुभांगी केदार यांनी गायलं असून, संगीतकार चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याची सुरुवात हळदीची उधळण आणि सनईच्या पवित्र सूरांनी होते. मराठमोळ्या परंपरेनुसार जात्याची पूजा करून आणि सुवासिनींच्या कपाळाला हळद-कुंकू लावून जात्यावर हळकुंड दळण्याची पूर्वापार चालत आलेली संस्कृती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. ‘हळदीच्या रंगानं रुप सजलं बाई…’ हे हळूवार गाणं सुरू होतं. नायिका रितिका श्रोत्रीच्या हातांवर मेहंदी काढण्याची दृश्यं आणि तिच्या भोवतीचा मैत्रीणींचा घोळका लग्नसोहळ्याची आठवण करून देण्यासाठी पुरेसं ठरतं. या गाण्यात रितिकाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. दुसरीकडे प्रथमेश परब खिन्न मनानं बसलेला आहे. रितिकाचंही विवाह सोहळ्यातील रितीरिवाज आणि परंपरांकडं लक्ष नसून, तिच्या मनाचं पाखरू आपल्या डार्लिंगच्या शोधात हरवल्याचं जाणवतं. तिकडे निखिल चव्हाणही उदास चेहऱ्यानं बसलेला असल्यानं हे गाणं चित्रपटात नेमकं काय दाखवणार याबाबत उत्सुकता वाढते.
थोडक्यात काय तर भावनांचा गुंता या गाण्यात पहायला मिळतो. भावनांचा हा गुंता कसा सोडवला जातो ते ‘डार्लिंग’ पाहिल्यावरच समजणार आहे. रितिकाच्या ‘मनाचं पाखरू…’ नेमकं कोणाचं होणार याचं उत्तरही चित्रपटातच मिळणार आहे. या भावनांचे सोहळे अपरंपार, भेटूया सहकुटुंब, सहपरिवार फक्त चित्रपटगृहात या गाण्याच्या अखेरीस येणाऱ्या दोन ओळी रसिकांना सिनेमागृहात येण्याचं जणू आमंत्रणच देत असल्याचं जाणवतं. व्हिडीओ पॅलेसच्या माध्यमातून ‘डार्लिंग’च्या गाण्यांची प्रस्तुती केली जात आहे. दिग्दर्शनासोबतच ‘डार्लिंग’चं लेखनही समीर आशा पाटील यांनीचं केलं आहे. यात मंगेश कदम, आनंद इंगळे आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पहायला मिळणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments