संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा उद्या २७ डिसेंबर रोजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची उपस्थिती
कोल्हापूर/प्रतिनिधी: वैद्यकीय सेवेमध्ये रुजू होत असलेल्या कै. गुंडू (हमाल) अण्णाप्पा पाटील शैक्षणिक, सामाजिक मेडिकल बहुउद्देशीय चारिट्रेबल ट्रस्ट, नरेवाडी संचलित संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या मल्टी व कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्या शुभ हस्ते, तसेच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत आणि राजेश पाटील आ. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सरसह प्रसूती, हाडांचे आजार,नाक,कान, घसा, मोतीबिंदू अश्या इतर अनेक आजारांवर सुविधा उपलब्ध केल्या असून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे विभाग हॉस्पिटलमध्ये आहेत.४० बेड्सचे सुसज्ज असे गडहिंग्लज तालुक्यातील नरेवाडी येथे असणारे हे हॉस्पिटल तालुक्यासह कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागांतील अनेक गरजूंसाठी उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती चेअरमन मच्छिंद्रनाथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. अर्जुन शिंदे म्हणाले”भारतातील सर्वात आधुनिक रेडिएशन उपचार यंत्रणा, सुमारे तीस वर्षाचा रेडिएशन तंत्रातील जागतिक पातळीवर अनुभव असलेले पूर्णवेळ तंत्रज्ञ, निरोगी पेशी सुरक्षित ठेवून अगदी एक एम.एम. इतक्या अचूकतेने कॅन्सर पेशीवर उपचार करणे आणि टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथील दीर्घ अनुभव असलेले कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर हीच या हॉस्पिटलची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफ असून टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कॅन्सर मध्ये प्रशिक्षीत तज्ञ झालेले डॉक्टर उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्यदायी व सर्वसामान्यांना परवडतील अशा वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. शासकीय जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत उपचार उपलब्ध असणार आहेत. तसेच गरजू रुग्णांसाठी माफक दरात पिक-अप-ड्रॉप सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. जगासमोरील एक कठीण आव्हान म्हणून ज्या कर्करोगाकडे पाहिले जाते, अशा जीवघेण्या आजार असणार्यांना हे हॉस्पिटल वरदान ठरणार आहे.
यावेळी व्हीसीद्वारे ऑन्को-लाईफचे संस्थापक-अध्य्क्ष उदय देशमुख, डायरेक्टर रिसोर्स डॉ. प्रताप राजेमहाडीक, अभासेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, प्रसिद्धी प्रमुख़ अमरसिंह राजे,इंडियन कॅन्सर सोसायटीचे व्यवस्थापक अशोक चव्हाण, सुधाकर पाटील,सौ.सुनंदा नाईक आदी उपस्थित होते.