कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला ५८ लाख ६३ हजार रुपये चा नफा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण पतसंस्थेला ५८ लाख ६३ हजार चा नफा झाल्याची माहिती संस्थेचे सभापती संजय पाटील यांनी ५७ व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली तसेच संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला ५७ वा वार्षिक अहवालाचे वाचन संस्थेचे सेक्रेटरी श्री सुधाकर सावंत यांनी केले सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली सर्व सभासदांना बोलण्याची संधी देऊन त्याने केलेल्या सूचनांचे स्वागत करून त्याप्रमाणे कार्यवाही करत असल्याचे सेक्रेटरी सुधाकर सावंत यांनी सांगितले
संस्थेचे खजानिस श्री उमेश देसाई यांनी भाग भांडवल १ कोटी करणे तसेच संस्थेच्या नाव विस्तार कोल्हापुर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था असे करण्याचा ठराव मांडला त्यास सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली या सभेस संचालक संजय कडगावे,प्रकाश पाटील,उत्तम गुरव, शिवराज नलवडे,सरिता सुतार,आशालाता कांझर,वसंत आडके, सुभाष धादवड, राजेंद्र गेंजगे,शकील भेंडवडे,दिलीप माने,विजय जाधव,मनोज सोरप, सुभाष माने यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आभार संस्थेचे उपसभापती मनोहर शिंदे यांनी मानले.