Friday, November 22, 2024
Home ताज्या दातृत्वशील शिक्षक बांधवानी अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केली आर्थिक मदत

दातृत्वशील शिक्षक बांधवानी अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केली आर्थिक मदत

दातृत्वशील शिक्षक बांधवानी अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केली आर्थिक मदत

कोल्हापूर/प्रतिनीधी : अखिलेश सूर्यकांत करोशी या हुशार , होतकरू अनाथ मुलाचं पालकत्व कोमनपा प्राथमिक शाळेचे सहा . शिक्षक श्री .सुनिल पाटील व चारूलता पाटील यां शिक्षक दांपत्यांनी स्वीकारलं आहे. त्यांना उजळाईवाडी येथील रविराई ट्रस्ट यांनी ही मोलाची साथ दिली. सध्या या मुलाला पुण्यातील नामवंत अशा COEP या इंजिनियरिंग कॉलेजला काँप्युटर सायन्सला प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला आहे. त्याच्या चार वर्षाच्या इंजिनियरिंग च्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. सामाजिक ऋण लक्षात घेऊन शिक्षक बांधवांना खा. प्राथ. शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष,शिक्षक नेते भरत रसाळे, समितीचे नेते सुधाकर सावंत व इतर संघटनाप्रमुखांच्या वतीने आवाहन केले .व या आवाहनास प्रतिसाद देऊन अल्पावधीतच दातृत्वशील शिक्षक बांधवांकडून सुमारे १ लाख रुपये निधी जमा झाला .
आज हा निधी रविराई ट्रस्ट , उजळाईवाडीचे विश्वस्त  चार्टर्ड अकौंटट मा .महेश धर्माधिकारी , सावली केअर सेंटरचे सर्वेसर्वा डॉ. किशोर देशपांडे, रवि राईचे विश्वस्त चंद्रशेखर पाटील व खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे ,मनपा प्राथमिक शिक्षक समितीचे नेते सुधाकर सावंत यांच्या हस्ते कु. अखिलेश याला देण्यात आला. यावेळी समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई,शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे,संतोष आयरे,अशोक आरंडे, शहराध्यक्ष संजय पाटील,विलास पिंगळे,भारती सूर्यवंशी,संजय कडगांवे ,स्मिता कारेकर,उत्तम कुंभार ,जोतिबा जाधव ,सुनिल पाटील ,चारुलता पाटील ,कुमार पाटील ,राम भोळे ,युवराज सरनाईक ,सचिन यादव , डॉ .सविता देसाई , ही प्रमुख मंडळी उपस्थिती होती.
यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतांतून ट्रस्टच्या सामाजिक कामाचे व सुनिल पाटील दांपत्याचे सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी पुढील काळात रवि – राई ट्रस्ट , सावली केअर सेंटर व आमच्या शिक्षक संघटना मिळून असे विधायक उपक्रम राबवू या असे आवाहन केले.
विश्वस्त महेश धर्माधिकारी यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन रवि -राई स्ट्रस्ट हा अमेरिकास्थित उद्योजक सर्जेराव देशमुख व सौ प्रतिभा देशमुख यांच्या सहकार्यातून उभा राहिल्याचे सांगून, आर्थिक दुर्बल व निराधार मुलांना देत असलेल्या शिक्षणाबरोबरच इतरराबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. देशपांडे यांनी सावली सेंटरचे कार्य सांगितले, तर सुधाकर सावंत व संजय पाटील यांनी समितीच्या कार्याचI आढावा घेतला.चारुलता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले .या सर्व कार्यक्रमाचे संयोजन रवि राई संस्थेचे व्यवस्थापक दिनकर राणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments