Friday, September 20, 2024
Home ताज्या काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह २३० रक्तदात्यांनी केले...

काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह २३० रक्तदात्यांनी केले रक्तदान

काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह २३० रक्तदात्यांनी केले रक्तदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा” असे आवाहन करत नामदार सतेज पाटील यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.पालकमंत्री नामदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराला उत्स्फूर्त देत जवळपास २३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.गेल्या एक दीड महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.या काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत होती. कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्या मध्ये सध्या रक्त साठा कमी आहे.भविष्यात कुठेही रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये यासाठी आज पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी आज काँग्रेस कमिटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत या रक्तदान शिबिरासाठी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत पालकमंत्र्यांच्या सामाजिक उपक्रमाला पाठबळ दिले. पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी देखील या शिबिरात स्वतः सहभागी होत रक्तदान केले पालकमंत्री नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी मी रकदान करतोय तुम्हीही रक्तदान करा.असे आवाहन करीत रक्तदान करण्याचे आवाहन रक्तदात्याना केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान केले.डॉ.डी. वाय.पाटील हॉस्पिटल,सीपीआर,राजर्षी शाहू ब्लड बँक यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे या शिबिरात माजी महापौर निलोफर आजरकेर यांच्यासोबत स्वाती नलवडे, उज्वला चौगले,पद्मिनी माने,शिवांगी खोत या महिलांनी देखील रक्तदान केले.सुरुवातीला उजळाइवाडी येथील राहुल मिनेकर आणि निशा मिनेकर या दाम्पत्याने रक्तदान केले.याबाबद्दल नामदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांनी विशेष कौतुक केले.आजच्या रक्तदान शिबीरासाठी नेटक नियोजन करत प्रथम प्रत्येक रक्तदात्याची लेखी नोंदणी करून रक्तदान करून घेतले जात होते.रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला नामदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नामदार सतेज पाटील यांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी आमदार ऋतुराज पाटील,माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, विद्याधर गुरबे,माजी नगरसेवक तोफिक मुल्लाणी, प्रविण केसरकर, सचिन चव्हाण, संजय पवार वाईकर, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, रंगराव देवणे,जय पटकारे,दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, दीपक थोरात, विनायक कारंडे, संध्या घोटणे, चंदा बेलेकर,लीला धुमाळ, हेमलता माने,सुलोचना नायकवडी, पूजा आरडे, विद्या घोरपडे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments