पायोनियर अभिव्यक्ती २०२१ चे सीओईपी पुणे विजेते – केआयटीमध्ये पायोनियर २०२१ उत्साहात संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूर ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक (ऑनलाईन) स्पर्धा पायोनियर २०२१ या स्पर्धेच्या अभिव्यक्ती प्रकारामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे येथील विस्पी करकरिया, संकेत वर्देकर या विद्याथ्र्यांनी विजेतेपद पटकाविले तर केआयटीच्या श्रीधर कटवे, क्रेया चोपडे आणि ऐश्वर्या पाटील, विनायक माळी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. पायोनियर २०२१ स्पर्धेचा ऑनलाईन पारितोषिक वितरण सोहळा आयएसटीईचे चेअरमन मा. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. पी.एस.पाटील यांची सन्माननीय उपस्थिती होती. तर केआयटीचे उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी हे अध्यक्षस्थानी होते.
आपल्या प्रमुख भाषणात मा. प्रतापसिंह देसाई यांनी विद्याथ्र्यांना पदवीपेक्षा कौशल्यांवर भर देण्याचे आवाहन केले. आणि इंजिनिअरींग क्षेत्रातील सद्यपरिस्थीतीचा आढावा घेतला. तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. पी.एस.पाटील यांनी उपस्थित विद्याथ्र्यांना संशोधनाचे महत्व सांगून संशोधनाची प्रक्रिया स्पष्ट केली. अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. सुनिल कुलकर्णी यांनी केआयटीच्या अशा उपक्रमांना व्यवस्थापनाचे नेहमीच पाठबळ राहिल असे सांगून विद्याथ्र्यांना शुभेच्छा दिल्या.
केआयटीचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. केआयटी आयएसटीईचे समन्वयक अभिजीत पाटील यांनी अहवाल वाचन केले. प्रा. क्षितीजा ताशी यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली.
यावेळी पायोनियर २०२१ या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयएसटीई स्टुडंट चाप्टरची विद्यार्थिनी मधुरा शिंदे हिने केले. यावेळी कार्यक्रमाला रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार, विद्यार्थी उपक्रम प्रमुख डॉ. अक्षय थोरवत, ग्रंतेज ओतारी व आयएसटीई विद्यार्थी प्रमुख दिविजा भिवटे आदी उपस्थित होते. आर्या पाटील, सिध्दांतपाटील यांनी सूत्रसंचालन व मधुरा शिंदे हिने आभार प्रदर्शन केले. पायोनियर २०२१ चा निकाल असा आहे.
अभिव्यक्ती (पेपर प्रेझेंटेशन)
प्रथम पारितोषिक विस्पी करकरिया संकेत वर्देकर कॉलेजचे नाव कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे द्वितीय पारितोषिक श्रीधर कटवे , क्रेया चोपडे कॉलेजचे नाव केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर तृतीय पारितोषिक ऐश्वर्या पाटील , विनायक माळी
कॉलेजचे नाव केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर प्रकल्प स्पर्धा ५ विभाग विजेते मेकॅनिकल इंजि.
प्रथम पारितोषिक वृषभ कराडे, संघर्ष पाटील
इमॅन्युअल तोंडीकट्टी समृध्दी हर्डीकर
कॉलेजचे नाव केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर. द्वितीय पारितोषिक विस्पी करकरिया , संकेत वर्देकर,राहूल येडगिरे
कॉलेजचे नाव कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे
तृतीय पारितोषिक सुशांत मोरे , शेख उबेद आस्लम, ओंकार वर्णे कॉलेजचे नाव केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर.कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजि. प्रथम पारितोषिक श्रेयस साळुंखे कॉलेजचे नाव केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर. द्वितीय पारितोषिक निखीग जुगळे वैशाली कदम, मिताली चौगुले , रणजीत चव्हाण, कॉलेजचे नाव केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर.
तृतीय पारितोषिक वाघेश्वर यादव
कॉलेजचे नाव केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर. इलेक्ट्रॉनिक, ई अॅन्ड टी. सी. अॅण्ड इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग
प्रथम पारितोषिक तेजस चव्हाण, जयतीर्थ दांबळ,श्रीराज घोरपडे ,रुपेश पोवार
कॉलेजचे नाव डीकेटीई सोसायटीज टेक्स्टाईल अॅण्ड इंजि. इन्स्टिटयुट इचलकरंजी.
द्वितीय पारितोषिक आर्या सावंत, यशदीप पाटील कॉलेजचे नाव केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर. तृतीय पारितोषिक शुभम भरमगोंडा, विकास केसरवाणी
धनंजय कटगिरी सचिन फडतरे
कॉलेजचे नाव – शरद इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, यड्राव.बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरींग
प्रथम पारितोषिक निलम मुजावर, ऐश्वर्या किल्लेदार,रेवती गुरव कॉलेजचे नाव – डीकेटीई सोसायटीज टेक्स्टाईल अॅण्ड इंजि. इन्स्टिटयुट इचलकरंजी. द्वितीय पारितोषिक – शर्वरी देवणे, दिविजा भिवटे, गिरीजा भालकर
कॉलेजचे नाव – केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर.तृतीय पारितोषिक – सायली लोळे,अकृती स्वामी, जाई सावंत
कॉलेजचे नाव – केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर.सिव्हील इंजि. आणि इन्व्हायरमेंटल इंजि. प्रथम पारितोषिक – समृध्दी पाटील, रिंकिता तायडे कॉलेजचे नाव – पिंपरी चिंचवड, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे.
द्वितीय पारितोषिक – पुजा एकनाळी
कॉलेजचे नाव – केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर.तृतीय पारितोषिक – राजगुरु कांबळे,योगेंद्र पवार,ओंकार खामकर, जिज्ञासा राऊत कॉलेजचे नाव – केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर.