गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठी ताकद मिळाली – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : चंदगड विधानसभा मतदार संघाचे नेते गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठी ताकद मिळाली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले. यापुढे कार्यकर्त्यांची मोट बांधून हातात हात घालून काम करा अस आवाहनही त्यांनी केले गोपाळराव पाटील यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते.
चंदगड विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ठ नेते आणि दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यासह, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी, गोपाळराव पाटील हे मूळचे काँग्रेसचे असल्यामुळे त्यांची ही घरवापसी असल्याचं त्यांनी सांगितल. त्यांच्या प्रवेशामुळे दुधात साखर पडली असल्याचे गौरवोद्गारही पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले. गोपाळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा भव्य मेळावा घेण्याच नियोजित होत. मात्र कोरोनामुळे हा मेळावा घेता आला नसला, तरी येणाऱ्या काळात त्यांच्या प्रवेशाचा चंदगड तालुक्यात भव्य मेळावा घेण्याचही नामदार सतेज पाटील यांनी जाहीर केल. शिवाय गोपाळराव पाटील यांच्या प्रवेशामुळे चंदगड गडहिंग्लज आणि आजरा या तालुक्यात काँग्रेसला मोठी ताकद मिळेल, असा विश्वास व्यक्त करत यापुढे कार्यकर्त्यांची मोट बांधून हातात हात घालून पक्षवाढीसाठी काम करा अस आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले
दरम्यान पक्ष प्रवेशानंतर बोलताना गोपाळराव पाटील यांनी, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले. यापुढे गोपाळराव पाटील गट म्हणून न राहता काँग्रेस म्हणून काम करणार असल्याच त्यांनी सांगितल. चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपले योगदान राहील. चंदगड विधानसभा मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी घ्यावी, शिवाय प्रलंबित कामासाठी निधी द्यावा अशी मागणी देखील गोपाळराव पाटील यांनी यानिमित्ताने केली. याशिवाय काही कारणामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. मला पक्षात योग्य न्याय, सन्मान न मिळाल्यानेच आपण भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये घरवापसी करत असल्याचही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, कॉंग्रेसचे चंदगड तालूकाध्यक्ष संभाजीराव देसाई, आदींनी मनोगत व्यक्त केल. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पाणा भोगम, चंदगड पंचायत समिती सभापती अनंत कांबळे, विक्रम चव्हाण, विद्याधर गुरबे, अशोक जाधव,संजय पाटील, विष्णू गावडे, राहुल खंजीरे, संजय पवार- वाईकर यांच्यासह चंदगड तालूक्यातील सरपंच, उपसरपंच कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.