Wednesday, October 9, 2024
Home ताज्या कोल्हापूर विमानतळबाबत बैठक संपन्न

कोल्हापूर विमानतळबाबत बैठक संपन्न

कोल्हापूर विमानतळबाबत बैठक संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळ नाईट लँडिंग, कार्गो सेवा, धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग आदी विषयांबाबत पाहणी करून आढावा बैठक घेण्यात आली.गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत विविध विकास कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये, धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग, संरक्षण भिंत, रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीजपुरवठा आदी कामांचा समावेश आहे.

कोल्हापुरातील नाईट लँडिंग बाबत नागरी उड्डाण संचानालय यांनी अडथळे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यापैकी काही अडथळे काढण्यात आली असून काहींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून नागरी उड्डाण संचानालय अधिकाऱ्यांसोबत दिल्लीला पुढील आठवड्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
विमानतळ बिल्डिंग कामामध्ये कोरोना संकटामुळे काही काळ व्यत्यय आला असल्याने हे काम आता येणाऱ्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे.कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्‍त ६४ एकर जागा संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या भूसंपादनामुळे धावपट्टीचे विस्तारीकरण १३७० मी. वरून २३०० मीटरपर्यंत होणार आहे.
विमानतळासाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या १५ दिवसांमध्ये पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. सोबतच समर्पित ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे सुद्धा काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सुमारे २ लाख १३ हजार प्रवास्यांनी कोल्हापूर विमानतळावरून प्रवास केला आहे. कोल्हापूरमध्ये अद्यावत विमानसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आणि अजून जास्तीचे मार्ग लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वचजण कटीबद्द आहोत असे पालकमंत्री म्हणाले.छ. राजाराम महाराज यांनी सुरु केलेल्या या कोल्हापूर विमानतळाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आले आणि त्यांनी कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभे राहण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचा मनापासून आभारी आहे असे सांगितले.
या बैठकीला, खा. संभाजीराजे छत्रपती, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, व्ही.बी.पाटील, तेज घाटगे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विमानतळ संचालक कमलकुमार कटारीया आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments