बहुजन पत्रकार संघाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विचारशील कृतीतून साजरी ब्लड कॅन्सर ग्रस्त मुलीला दहा हजाराचा धनादेश प्रदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : अखंड हिंदुस्थानचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती निमीत्त शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन कोल्हापूर बहुजन पत्रकार संघ व ग्रोबझ यांच्या संयुक्त विद्यमाने छ.शिवाजी महाराज यांची जयंती विचारशील कृतीतून साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती समाजकल्यान चे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मा.श्रीकृष्ण कटकधोंड
ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड.धनंजय पठाडे मा.विश्वास कोळी (सी.एम.डी.ग्रोबझ) जेष्ठ अॅड परवेजभाई खान, डी.जी भास्कर सर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी कोल्हटकर उपाध्यक्ष मुबारक आत्तार, रवीसागर हाळवणकर, प्रकाश कांबळे,आफताब खान, स्वप्निल पन्हाळकर, बाजीराव गावकर व संघाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच सामाजीक बांधिलकी म्हणुन कु. सिद्धी मोहन कांबळे, रा. आडुळ, ता.करवीर या छोटया मुलीस ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले असून तिच्या उपचाराचा खर्च भागवण्याचा प्रश्न निर्माण झाला असुन ग्रोबझ आणि कोल्हापूर बहुजन पत्रकार संघ व मानवधिकारी न्याय सुरक्षा ट्रस्ट कोल्हापूर अध्यक्ष महम्मदयासीन शेख यांच्या संयुक्त सहकार्यातुन मदतनिधीचा १०,००० धनादेश सर्वांच्या उपस्थितीमधे सुपुर्त करण्यात आला. सिद्धी मोहन कांबळे या मुलीस पुढील उपचारास पत्रकार संघ व मानव अधिकार ट्रस्ट कार्यशील राहील.